आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाद:सोनाक्षीविषयी केलेल्या कमेंटवर मुकेश खन्ना यांचे स्पष्टीकरण, म्हणाले - शत्रुजींना वाटते की माझी चुक झाली तर ती मला मान्य आहे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेता आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सध्या ‘रामायण’शी संबंधित एका प्रश्नाचे उत्तर देऊ शकली नसल्यामुळे ट्रोल होत आहेे.

लॉकडाऊनच्या काळात रामायण आणि महाभारत यासारख्या पौराणिक मालिका पुन्हा सुरु झाल्याने चाहते आनंदात आहेत. पण पौराणिक विषयावरील अज्ञानामुळे सोनाक्षी सिन्हा ट्रोल झाली होती. तो वाद अद्याप शमला नाहीये.  काही दिवसांपूर्वी महाभारतात भीष्म पितामहची भूमिका साकरणारे मुकेश खन्ना यांनी सोनाक्षीविषयी केलेले वक्तव्य तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांना आवडले नाही, यावर मुकेश खन्ना यांनी आता प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

  • मुकेश खन्ना यांनी स्पष्टीकरण दिले

मुकेश खन्ना यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, 'लोकांनी माझ्या कमेंटचा चुकीचा अर्थ काढला आणि त्यांनी शत्रुघ्न यांना चुकीची माहिती दिली. मी ब-याच काळापासून त्यांना ओळखतो आणि त्यांचा आदर करतो. मी फक्त उदाहरण म्हणून सोनाक्षीचे नाव घेतले होते. याचा अर्थ असा नाही की मी सोनाक्षीला कमी लेखू इच्छितो किंवा तिच्या ज्ञानावर प्रश्न उपस्थित करु इच्छितो. माझा उद्देश तिला लक्ष्य करणे नव्हता. जर शत्रुजींना वाटत असेल की सोनाक्षीचे नाव घेणे ही माझी चूक आहे तर ती आहे, परंतु हे मुद्दाम केले गेले नाही.

  • मुकेश खन्ना काय म्हणाले होते?

पौराणिक कथांबद्दल ज्यांना काहीच माहिती नसते त्यांच्यासाठी या पौराणिक मालिकांचे पुनर्प्रक्षेपण चांगले ठरेल, असे मुकेश खन्ना यांनी म्हटले होते. यावेळी त्यांनी सोनाक्षी सिन्हाचे नावही घेतले, जी केबीसी 11 मध्ये हनुमानाने संजीवनी बूटी कुणासाठी आणली होती, हे सांगू शकली नव्हती. अशा परिस्थितीत मुकेश खन्ना यांनी सोनाक्षीवर केलेल्या कमेंटनंतर तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा तिच्या बचावासाठी पुढे आले.  

  • शत्रुघ्न सिन्हा यांनी चोख प्रत्युत्तर दिले

अभिनेता आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांनी नाव न घेता मुकेश खन्ना यांच्यावर निशाणा साधत म्हटले होते की, ‘सोनाक्षी ‘रामायण’शी संबंधित प्रश्नाचे उत्तर देऊ शकली नाही, याचा ज्या कुणाला त्रास होत आहे मी त्यांनाच विचारतो तुम्ही काय पौराणिकतेतील विशेतज्ञ आहात का?’ फक्त ‘रामायण’शी संबंधित प्रश्नाचे उत्तर न दिल्याने सोनाक्षीला अपात्र ठरवले जाऊ शकत नाही. तिला कोणाकडूनही प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नाही. मला माझ्या मुलीचा अभिमान आहे. ती स्वत:च्या बळावर स्टार झाली आहे.’

बातम्या आणखी आहेत...