आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुकेश खन्ना भडकले:अजय देवगन आणि शाहरुख खानवर चांगलेच संतापले मुकेश खन्ना. म्हणाले - 'ऊंचे लोगों की नीची पसंद'

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'कधी स्वतः खाऊन बघितलंय का?' अशा प्रश्न त्यांनी केला आहे.

ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक मुद्यांवर आपले मत व्यक्त करत असतात. अलीकडेच त्यांनी अभिनेता शाहरुख खान आणि अजय देवगणवर ताशेरे ओढले आहेत. या दोघांनी तंबाखूजन्य पदार्थांचा प्रचार केल्याबद्दल मुकेश यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मुकेश यांनी सोशल मीडियावर अजय देवगणचा फोटो शेअर करत 'कधी स्वतः खाऊन बघितलंय का?' अशा प्रश्न केला आहे.

मुकेश खन्ना यांनी लिहिले, ''बोलो जुबान केसरी, ऊँचे लोगों की पसंद , मैं यूं ही नहीं बन जाता, आय एम द मेन ऑफ ऑल सीजन…काय आहे हे सगळं.. लोकांना भटकावण्याचा धोकादायक रस्ता. नुकसान पोहोचवणा-या वस्तूंचा नाटकी प्रचार.. खाणारा, प्रचार करणारा किंवा सरकार... याला कुणीच का थांबवत नाही. कुणाच्या बापाचं काय जातं,'' अशा शब्दांत मुकेश खन्ना यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

कलाकारांवर व्यक्त केला संताप
या विषयाशी संबंधित त्यांनी व्हिडिओ देखील शेअर केला. त्यामध्ये ते म्हणाले, "आपल्या आजूबाजूला अशी अनेक उत्पादने आहेत जी शरीरासाठी हानिकारक आहेत. परंतु तरीही सरकार त्यांना मंजूरी देते. मी सिगारेट, मद्य आणि गुटखा याबद्दल बोलत आहे. मला सरकारपेक्षा त्या बॉलिवूड कलाकारांचे जास्त आश्चर्य वाटते, जे आपला चेहरा देऊन या वस्तूंचा प्रचार करतात."

शक्तीमान परततोय
मुकेश खन्ना त्यांच्या लोकप्रिय 'शक्तीमान' या मालिकेवर आधारित चित्रपट घेऊन येत आहेत. 'शक्तीमान' ही मालिका दूरदर्शनवर 1997 ते 2005 या काळात प्रसारित झाली होती. आता त्याच्या कथेवर तीन भागात चित्रपट बनवला जाईल. पुढील वर्षीच्या जूननंतर चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल.

बातम्या आणखी आहेत...