आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'शक्तीमान' या गाजलेल्या टीव्ही मालिकेवर आता चित्रपट येतोय. मुकेश खन्ना यांनी शक्तीमानच्या कथेवर तीन भागात चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली आहे. मुकेश यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, ते टीव्हीवर किंवा ओटीटीवर नव्हे तर मोठ्या स्क्रीनवर परतत आहेत. ते म्हणतात - हे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. शक्तीमान हा पहिला भारतीय सुपरहीरो होता आणि तो नेहमीच असेल. एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसशी हातमिळवणी केली आहे, मी म्हणेन, जे काही बनवले जाईल ते कृष-रा वनपेक्षा मोठे असेल.
View this post on InstagramA post shared by Mukesh Khanna (@iammukeshkhanna) on Oct 1, 2020 at 11:45pm PDT
मुकेश शक्तीमानला मानतात सुपर टीचर
मुकेश पुढे म्हणाले की, मी स्वत: शक्तीमानला श्रेष्ठ शिक्षक म्हणतो. मला आनंद आहे की आता आम्ही धमाकेदार काहीतरी घेऊन परत येत आहोत. ही सदाबहार आणि समकालीन कथा आहे.
पुढील वर्षी शूटिंग सुरू होईल
या ट्रायोलॉजीच्या पहिल्या चित्रपटाचे शूटिंग पुढच्या वर्षी जूननंतर सुरू होईल. या चित्रपटात पूर्वीप्रमाणे शक्तीमानचे साहस दाखवले जाईल. तर शीर्षक तेच असेल. शक्तीमान ही मालिका 1997 ते 2005 या काळात दूरदर्शनवर प्रसारित झाली होती. लॉकडाऊन दरम्यान ती पुन्हा प्रसारित केली गेली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.