आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘पठाण’ या चित्रपटाचा वाद शमण्याची सध्या तरी चिन्ह दिसत नाहीयेत. अनेक स्तरातून या चित्रपटाला विरोध दर्शवला जातोय. चित्रपटामधील ‘बेशरम रंग’ हे गाणे प्रदर्शित होताच वादाला तोंड फुटले. या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्याने हा वाद उफाळला आहे. सोशल मीडियावरूनही या चित्रपटाला विरोध दर्शवण्यात येत आहे. अनेक राजकीय मंडळींनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. काही ठिकाणी चित्रपटाच्या निषेधार्थ कलाकारांचे पोस्टर जाळण्यात आले. आता या वादामध्ये अभिनेते मुकेश खन्ना यांनी उडी घेतली आहे. त्यांनी गाण्याचे बोल आणि दीपिकाच्या ड्रेसवर आक्षेप घेतला आहे.
मुकेश खन्ना यांचा विरोध
एका मुलाखतीत मुकेश खन्ना म्हणाले, "आजच्या पिढीतील मुले टीव्ही आणि चित्रपट पाहून मोठी होत आहेत. सेन्सॉर बोर्डाने अशाप्रकारच्या गाण्यांना मान्यता देऊ नये. सेन्सॉर बोर्ड काही सर्वोच्च न्यायालय नाही. ज्याला आपण विरोध करू शकत नाही. आपला देश काही स्पेन नाही जिथे अशाप्रकारची गाणी प्रदर्शित होतील. आता अर्धे कपडे परिधान करुन गाणी प्रदर्शित केली जात आहेत. काही काळानंतर कपडे परिधान न करताच गाणी तयार करण्यात येतील," असे ते म्हणाले. सेन्सॉर बोर्ड असे गाणे का पास करते हे समजत नाही, असेही ते म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "भगवा रंग एका धर्मासाठी किती महत्त्वाचा आहे हे गाणे बनवणाऱ्याला माहित नाही का? ज्याला आपण भगवा रंग म्हणतो तो शिवसेना पक्षाचा झेंडाही आहे. आपल्या आरएसएसमध्येही या रंगाचा सामावेश आहे. अमेरिकामध्ये त्यांच्या देशाच्या झेंड्याची बिकिनी तुम्ही परिधान करू शकता. पण भारतात अशाप्रकारचे कपडे परिधान करण्यास मान्यता नाही," असे मुकेश खन्ना म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.