आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'शक्तिमान' जिवंत आहेत:निधनाच्या अफवांचे खंडन करण्यासाठी समोर आलेत मुकेश खन्ना, म्हणाले - 'तुमचा आशिर्वाद माझ्यासोबत आहे'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या अफवा पसरवणाऱ्यांवर त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

महाभारतातील भीष्म पितामह आणि पहिला भारतीय सुपरहीरो शक्तिमान फेम प्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना अगदी ठीक आहेत. अलीकडेच सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची अफवा पसरली होती. मात्र मुकेश खन्ना यांनी स्वतः एक व्हिडिओ शेअर करत या अफवांचे खंडन केले आहे. तुमच्या आशीर्वादाने मी ठिक आहे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे ते म्हणाले आहेत. शिवाय या अफवा पसरवणाऱ्यांवर त्यांनी संतापदेखील व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत मुकेश खन्ना म्हणाले, 'तुमच्या आशिर्वादाने मी अगदी सुरक्षित आणि निरोगी आहे. मला कोरोनाची लागण झाली नसून मी कोणत्याही रुग्णालयात उपचार घेत नाहीये. मला माहित नाही ही अफवा कुणी पसरवली आणि ही अफवा पसरवण्यामागचे कारण काय? अशा खोट्या बातम्या पसरवून काही जण लोकांच्या भावनांशी खेळत आहेत,' असे ते या व्हिडिओत म्हणाले आहेत.

तीन आठवड्यांपूर्वी झाले भावाचे निधन
मुकेश खन्ना यांचे भाऊ सतीश यांचे तीन आठवड्यांपूर्वी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. सतीश यांना कोरोना संसर्गदेखील झाला होता. होम आयसोलेशनमध्ये राहून ते सर्व प्रोटोकॉल्सचे पालन करत होते. 8 एप्रिल रोजी त्यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्टदेखील निगेटिव्ह आला होता. पण नंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली होती.

बातम्या आणखी आहेत...