आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीर दासवर संतापले मुकेश खन्ना:'अमेरिकेत जितक्या टाळ्या मिळाल्या, तितके चाबकाचे फटके द्यायला हवेत', वीर दासच्या 'त्या' व्हिडिओवर मुकेश खन्नांची संतप्त प्रतिक्रिया

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुकेश खन्ना यांनी वीर दासवर निशाणा साधला आहे.

ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी कॉमेडियन वीर दासचा चांगलाच समाचार घेतला आहे. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओत त्यांनी अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन वीर दासवर कडाडून टीका केली आहे. परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्याला चाबकाचे फटके द्यायला हवेत, अशा शब्दांत मुकेश खन्ना यांनी वीर दासवर निशाणा साधला आहे.

मुकेश खन्ना यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओत त्यांनी वीर दास आणि त्याच्या वादग्रस्त कवितेवर भाष्य केले आहे. आणखी एक स्टँडअप कॉमेडियन आणि आणखी एक चूक. जो स्वत:ला मोठा, प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन समजतो त्याने स्टँड-अप कॉमेडीचे नाव खराब केले आहे. त्याला नेमके सिद्ध तरी काय करायचे आहे. तो खूप बोल्ड आहे?

व्हिडिओ शेअर करत पुढे मुकेश खन्ना म्हणाले, 'Washington DC च्या हॉलमध्ये जितक्या टाळ्या वाजल्या, भारतीयांनी तितकेच चाबकाने फटके त्याला दिले पाहिजे. परदेशात जाऊन आपल्या भारत मातेचा अपमान करण्याची भविष्यात कोणाचीही हिंमत व्हायला नको', असे मुकेश खन्ना यांनी म्हटले आहे.

काय आहे वाद?
कॉमेडियन वीर दासने वॉशिंग्टन डीसी येथील जॉन एफ केनेडी सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्समधील त्याच्या परफॉर्मन्सचा व्हिडिओ त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केल्यावर वाद सुरू झाला. सहा मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये वीर दासने अमेरिकेतील लोकांसमोर भारतातील लोकांच्या दुहेरी स्वभावाचा उल्लेख केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक संतापले असून त्याच्यावर परदेशात भारताची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप होतोय.

वीर दासने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर 'आय कम फ्रॉम टू इंडियाज' नावाचा व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये वीर दासने भारतातील प्रचलित गोष्टींवर व्यंगात्मक टिप्पणी केली. "मी अशा भारतातून आलो आहे जिथे मास्क घातलेली मुले एकमेकांचा हात धरतात आणि जिथे नेते मास्कशिवाय एकमेकांना मिठी मारतात. मी अशा भारतातून आलो आहे जिथे आपण बॉलिवूडवरून विभागल्याचा दावा ट्विटरवर करतो आणि आणि थिएटरच्या अंधारात बॉलिवूडमुळे एकत्र आहोत," अशी त्याच्या कवितेची सुरुवात आहे. यासोबतच या कवितेतील 'मी त्या भारतातून येतो, जिथे आम्ही दिवसा महिलांची पूजा करतो आणि रात्री सामूहिक बलात्कार' अशी एक ओळ वादात अडकलीय.

बातम्या आणखी आहेत...