आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेते मुकेश तिवारी यांनी 1998 मध्ये आलेल्या चायना गेटमधून खलनायकाच्या भूमिकेतून करिअरची सुरुवात केली. ते मध्यप्रदेशातील सागरचे आहेत. त्यांनी नुकताच आपला 50 वा वाढदिवस साजरा केला. यंदा त्यांनी सहा मुलांना शिकवण्याचा संकल्प घेतला आहे.
हातून गेला चित्रपट...
लाॅकडाऊनच्या काळात त्यांच्या हातुन विलगीकरणाच्या नियमांमुळे एक मल्याळम चित्रपट निघून गेला. त्यांच्याशी संपर्क करण्यात आला मात्र मुकेशने दुसऱ्या कलाकाराला घेण्याचे सांगितले, कारण अभिनेत्यापेक्षा सिनेमा महत्त्वाचा असतो. मुकेश म्हणतात, हा शक्यतांचा खेळ आहे. ज्या दिवशी शक्यता संपेल, त्या दिवशी आपले पॅकअप झाल्याचे समजा.
घराणेशाहीविषयी म्हणाले...
घराणेशाहीविषयी मुकेश म्हणतात, 30-40 वर्षांपासूनही व्यवस्था बनली आहे. अचानक असे काही घडले नाही. येथे संबंध चांगले असले तरच काम मिळते, प्रतिभा नंतर येते. मात्र नव्या प्रतिभेला दाबले जाते. त्यांच्याशी चांगले वागायला हवे. लोक तुम्हाला पसंती करतात, तेव्हा आमच्या प्रतिभेने मिळाले असे तुम्ही म्हणता. आज सोशल मीडियामध्ये तेच लोक तुम्हाला नापसंती दर्शवत आहेत. तुम्हाला डिसलाइक करत आहेत, याला तुमचे अपयश म्हणावे लागेल.
आईची येते आठवण...
मुंबईत राहणाऱ्या मुकेशला आई आणि कुटुंबाची आठवण येते. आजही त्यांना सागर येथील घरा जवळील पानाची दुकान आठवते. पण ते पान खात नाहीत. या वाढदिवशी त्यांनी सागर येथील 6 गरजु मुलांना शिकवण्याचा संकल्प घेतला आहे. मुकेश यांनी पागलपंती, गोलमाल अगेन सारख्या चित्रपटासह तामिळ आणि तेलगू सिनेमात काम केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.