आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्य घटनेवर आधारित 'मुखबिर​​​​​​​'चा ट्रेलर रिलीज:1965च्या भारत- पाक युद्धाची कहाणी सांगणार ही सिरीज

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

Zee5 ची आगामी वेब सिरीज 'मुखबिर - द स्टोरी ऑफ स्पाय'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ही 8 भागांची वेब सिरीज 11 नोव्हेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रसारित केली जाईल. शिवम नायर आणि जयप्रद देसाई दिग्दर्शित ‘मुखबीर – द स्टोरी ऑफ अ स्पाय’ ही भारताच्या पाकिस्तानातील गुप्त एजंटची प्रेरक कथा असून हा गुप्तहेर देशाचा बचाव करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आणि लढाईचा कल आपल्या देशाच्या बाजूने फिरवतो. सत्य घटेवर आधारित या सिरीजमध्ये झेन खान दुर्रानी, प्रकाश राज, आदिल हुसेन, बरखा सेनगुप्ता, झोया अफरोज, हर्ष छाया, सत्यदीप मिश्रा आणि करण ओबेरॉय यांच्या मुख्य भूमिका आहेत.

ही सिरीज सत्य घटनेवर आधरित असून ही भारताच्या गुप्त एजंटची कथा आहे. या एजंटकडून प्राप्त माहितीच्या आधारे शत्रू देशात भारताविरुद्ध शिजत असलेल्या आक्रमक कारवायांचा खुलासा होतो आणि भारताला हल्ला करणे क्रमप्राप्त ठरते. हेराने पुरवलेल्या माहितीच्या साह्याने 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताचा विजय होतो. झेन खान दुरानीने या सीरिजमधल्या मुख्य नायकाचे पात्र साकारले आहे. प्रकाश राज आणि आदिल हुसेन हे लष्करातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...