आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फॅमिली टाईम:मल्टी-टॅलेटेड कंगना रनोटने लव्ह स्टोरीच्या थीमवर वाजवला पियानो, क्लासिक अंदाज बघून चाहते झाले मोहित 

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाचा व्हिडीओ तिच्या टीमने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

बॉलिवूडची टॅलेंटेड अभिनेत्री कंगना रनोट लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मनाली येथे आपल्या कुटूंबासमवेत वेळ घालवत आहे. कंगनासोबत तिची बहीण रांगोलीचे कुटुंबदेखील आहे. कुटुंबासोबत क्वालिटी वेळ घालवत असलेल्या कंगनाचा अलीकडेच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती सुंदर शैलीत पियानो वाजवत आहे.

कंगनाचा व्हिडीओ तिच्या टीमने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, 'कंगनाने लव्ह स्टोरीच्या थीमवर तिच्या मनालीच्या घरी पियानो वाजवला आहे'. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये कंगना डेडिकेशनने पियानो वाजवताना दिसतेय. तिने वाजवलेली धून 1970 चा हॉलिवूड चित्रपट 'लव्ह स्टोरी'मधील आहे. कंगनाचे हे नवीन रुप बघून सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.

बहिणीसाठी बनली इंटेरियर डिझायनर

रांगोली चंदेल अलीकडेच तिच्या नवीन घरात शिफ्ट झाली आहे, याची रचना स्वत: कंगना रनोटने केली आहे. याबाबत माहिती देताना रंगोलीने आपल्या इंस्टा पोस्टमध्ये सांगितले की, कंगनाने लोकल मटेरियलच्या मदतीने घराची संपूर्ण सजावट केली आहे. शूटिंग चालू असताना कंगनाने ऑनलाईन ऑर्डर करुन सामान मागवले. यासाठी रंगोलीने तिचे आभारही मानले आहेत.

कंगनाने तयार केलेली कविता - 'आकाश'

मनालीमध्ये आपला निवांत वेळ घालवणा-या कंगनाने 'आकाश' ही कविता तयार केली आहे. त्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाला आहे, ज्याला कंगनाने आपला आवाजही दिला आहे.

कंगना 'अपराजित अयोध्या' चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे
'मणिकर्णिका' चित्रपटानंतर कंगना रनोट आता 'अपराजित अयोध्या' या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. अपराजित अयोध्याची कथा राम मंदिर आणि बाबरी प्रकरणावर आधारित आहे. याशिवाय ही अभिनेत्री लवकरच तमिळनाडूच्या माजी सीएम जयललिता यांचा बायोपिक 'थलाइवी'मध्येही झळकणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...