आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तानमध्ये नातेवाईकांना गमावले:पाक-अफगाणी अभिनेत्री मलिशा हिना खानने तालिबान्यांनी केलेल्या गोळीबारात 4 नातेवाईकांना गमावले, म्हणाली - आम्ही सुदैवाने भारतात आहेत

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मलिशा हिना खान गेल्याच वर्षी भारतात आली आहे.

पाकिस्तानी-अफगाण वंशाची अभिनेत्री मलिशा हिना खानने काबूल येथे झालेल्या हिंसाचारात आपल्या चार नातेवाईकांना गमावले आहे. मलिशा मागील वर्षापासून मुंबईत राहात आहे. तिच्या कुटुंबात पाच ते सहा सदस्य आहेत. त्यापैकी एक छोटा भाऊ आणि एक बहीण अद्याप अफगाणिस्तानमध्ये आहे, मात्र लपले आहेत. तिचे काका, भाचे आणि दोन चुलत भाऊ तालिबान्यांनी काबूल येथे केलेल्या गोळीबारात मृत्यूमुखी पडले.

सोशल मीडियावर दिली माहिती
मलिशा हिना खानने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘माझे कुटुंबीय आणि मी फार कठीण काळातून जात आहोत. गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही काबूलमधील आमच्या चार नातेवाईकांना गमावले आहे. हे चौघे ज्या कारमध्ये होते, त्यावर तालिबान्यांनी गोळीबार केला आणि त्यामुळे गाडीत स्फोट झाला. आम्ही सुदैवाने भारतात आहोत,’ या आशयाचे ट्वीट तिने केले आहे. सोबतच तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार देखील व्यक्त केले आहेत.

मलिशा हिना खान गेल्याच वर्षी भारतात आली आहे. ती 2018 मध्ये चर्चेत होती. त्यावेळी तिचे काही न्यूड व्हिडीओ व्हायरल झाले होते.

बातम्या आणखी आहेत...