आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

निसर्ग वादळाचा तडाखा:मुंबईत 109 वर्षांनंतर आले असे वादळ, अक्षय आणि प्रियांका म्हणाले - देवाकडे प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रत्येकजण सुरक्षित रहावे यासाठी प्रार्थना करा, असे कलाकारांनी म्हटले आहे.

अरबी समुद्रात तयार झालेले 'निसर्ग' चक्रीवादळ दुपारी 1 वाजता महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर धडकले. या भागात सुमारे 120 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. वादळाला येथून जाण्यास तब्बल 3 तासांचा वेळ लागला. महाराष्ट्रातील 21 आणि गुजरातच्या 16 जिल्ह्यांमध्ये वादळाचा परिणाम झाला आहे. दोन्ही राज्यांत एनडीआरएफने एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रासह बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी या वादळाविषयी चिंता व्यक्त केली असून ट्विटरवरुन यासंदर्भात आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रियांकाने आपल्या ट्विटबरोबर मुंबई महानगरपालिकेने वादळाच्या काळात काय करावे आणि काय करु नये यासंदर्भातील सूचनांचे फोटोही पोस्ट केले आहेत. 

प्रियांका म्हणाली - हे वर्ष अत्यंत कठोर आहे 

“चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने वाटचाल करत आहे. या शहरामध्ये 20 लाख लोकं राहतात. माझी आई आणि भाऊही याच शहरात राहतात. 1891 पासून कोणतेही मोठे वादळ मुंबईला धकडकलेले नाही आणि आता या वेळी जेव्हा जगभरामध्ये कोरोनाचे संकट आहे तेव्हा हे वादळ आल्याने मोठा फटका बसेल. हे वर्ष अत्यंत कठोर आहे. कृपया सर्वांनी निवाऱ्याची व्यवस्था करा. काळजी घ्या आणि यंत्रणांनी दिलेल्या नियमांचे पालन करा. सर्वांना सुरक्षित राहा,” असे प्रियांकाने दोन ट्विटमध्ये म्हटले आहे.

अक्षय कुमारने शेअर केला व्हिडीओ 

अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक व्हिडीओ मेसेज शेअर केला असून म्हटले की, 'मुंबईत बहुप्रतिक्षित पाऊल आला आहे, पण यावर्षी #निसरग वादळाच्या रुपात न बोलावलेला पाहुणाही आला आहे. जर हे वादळ मुंबईत धडकले तर बीएमसीने सांगितलेली खबरदारी घ्या.  आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. प्रत्येकजण सुरक्षित रहावे यासाठी प्रार्थना.'

नीना गुप्ता यांनीही अपील केली

अभिनेत्री नीना गुप्ता यांनीही व्हिडीओ संदेशाद्वारे लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले. आपल्या संदेशात त्या म्हणाल्या, ज्या ठिकाणी मुंबई आणि गोव्यासह वादळ ज्या ज्या ठिकाणी येणार आहे, तेथे राहणा-या लोकांनी सावधगिरी बाळगा. घराची दारंखिडक्या बंद ठेवा. या वादळाने कुठलेही नुकसान होऊ नये यासाठी सर्वांनी देवाकडे प्रार्थना करा, असे त्या म्हणाल्या आहेत. सोबतच त्यांनी घराबाहेर लावलेल्या कुंड्या घरात घेण्याची अपील केली आहे. 

View this post on Instagram

Bhagwan kare ye chupe se nikal jaye

A post shared by Neena Gupta (@neena_gupta) on Jun 2, 2020 at 8:46am PDT

दरम्यान, मुंबईत प्रथमच भीषण वादळाच्या तडाख्यात येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या सायक्लोन ई-अॅटलासनुसार 1891 नंतर प्रथमच महाराष्ट्राच्या किनारी भागात चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी 1948 आणि 1980 मध्ये अशी स्थिती निर्माण झाली होती, मात्र तेव्ही ती चक्रीवादळात बदलली नव्हती. मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांत हाय अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग या 7  जिल्ह्यांना वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.

0