आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोर्नोग्राफी प्रकरणात 19 जुलैपासून तुरुंगात असलेल्या राज कुंद्राला सोमवारी मोठा दिलासा मिळाला. मुंबईच्या सत्र न्यायालयाने त्याला 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिन मंजूर केला आहे. जामिन मंजूर करताना न्यायालयाने म्हटले की, राज स्थानिक पोलिस ठाण्याला कळवल्याशिवाय शहर सोडू शकत नाही.
अटकेनंतर त्याला प्रथम 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली, स्थानिक न्यायालयाने नंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तेव्हापासून तो तुरुंगात होता. यानंतर सत्र न्यायालयाने कुंद्राचा जामिन अर्ज फेटाळला होता. राज कुंद्रावर शर्लिन चोप्रापासून पूनम पांडेपर्यंत अनेकांनी गंभीर आरोप लावले होते. हे प्रकरण मुंबई सायबर पोलिसांकडे 2020 मध्ये नोंदवण्यात आले होते.
राज कुंद्रासह त्याचा आयटी प्रमुख रायन थार्प याचीदेखील जामिन याचिका मंजूर करण्यात आली आहे. न्यायालयाने जामिन अर्जावर मुंबई पोलिसांकडून उत्तरही मागितले होते. या प्रकरणात कुंद्रासह 11 आरोपींविरोधात 1500 पानी पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी, शर्लिन चोप्रासह 43 साक्षीदारांचे जबाब आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आले आहेत. या आरोपपत्रानंतर कुंद्राच्या जामिनाचा मार्ग मोकळा होताना दिसत होता.
सत्र न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला आहे जामीन अर्ज
यापूर्वी 28 जुलै रोजी स्थानिक न्यायालयाने राज कुंद्राची जामिन याचिका फेटाळली होती. फिर्यादी पक्षाच्या या युक्तिवादावर न्यायालय समाधानी दिसले की त्याच्या सुटकेनंतर राज कुंद्रा या प्रकरणात तपास आणि साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो. राज कुंद्रा शक्तिशाली असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते. तो या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. अशा परिस्थितीत जर त्याची सुटका झाली तर तो साक्षीदार आणि तपास या दोन्ही गोष्टींवर प्रभाव टाकू शकतो. तो पुरावा नष्ट करू शकतो. पोलिसांनी न्यायालयाला असेही सांगितले की, त्यांच्याकडे राज कुंद्राविरोधात ठोस पुरावे आहेत आणि गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या कार्यालयातून 68 एडल्ट व्हिडिओ जप्त केले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयातही प्रलंबित आहे कुंद्राचा अर्ज
सत्र न्यायालयात राज कुंद्राची जामिन याचिका फेटाळल्यानंतर ऑगस्टमध्ये त्याने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. राज कुंद्राने या प्रकरणात आपले स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, या प्रकरणात त्याच्यासोबत अडकलेल्या आणखी एका आरोपीला जामिन मंजूर करण्यात आला आहे, त्यामुळे त्याच्या बाबतीतही असाच निर्णय घ्यावा. राज कुंद्राचे वकील सुभाष जाधव म्हणाले की, राज कुंद्रावरील सर्व आरोप निराधार आहेत. राज कुंद्राने तयार केलेला कंटेंट पोर्नोग्राफीच्या कक्षेत येत नाही तर हा एक इरॉटिक कंटेंट आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.