आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किंग खानला दुसरा पर्याय:मुलाला अटक झाल्यानंतर शाहरुखने शूटिंग अर्ध्यावर सोडले, दिग्दर्शक एटली यांनी SRK च्या बॉडी डबलसोबत शूटिंग सुरु केले

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शाहरुखचा डुप्लिकेट प्रशांत वालदे याला शनिवारी रात्री उशिरा बोलावण्यात आले.
  • मुंबईतील चर्च गेट स्थित पारसी हॉस्पिटल येथे दिग्दर्शक एटली यांनी शाहरुखच्या डुप्लिकेटसह शूटिंग सुरु केले.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग प्रकरणात रविवारी अटक झाली आहे. त्याला न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. शनिवारी आर्यनला एनसीबीने ताब्यात घेतले होते. 22 तासांच्या चौकशीनंतर रविवारी त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणानंतर शाहरुख खानने दिग्दर्शक एटली यांच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण अर्ध्यावर सोडले आहे. सध्या शाहरुख शूटिंगवर येऊ शकणार नाहीये. त्यामुळे निर्मात्यांनी शाहरुखचा बॉडी डबल प्रशांत वालदे याला तातडीने बोलावले. आणि त्याच्याकडून शाहरुखचे सीन शूट करुन घेतले. शाहरुखची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे नाव लॉयन आहे. उल्लेखनीय म्हणजे, शाहरुख पुढच्या काही दिवसांत 'पठाण'च्या शूटिंगसाठी स्पेनला रवाना होणार होता, ज्याचे 21 दिवसांचे वेळापत्रक आहे.

बॉडी डबलने अॅक्शन सीन्स चित्रीत केले
'लॉयन' विषयी दैनिक भास्करशी बोलताना प्रशांत म्हणाला, "सोमवारी शूटिंगमधून ब्रेक देण्यात आला. निर्मात्यांनी रविवारी माझ्यावर काही महत्त्वाचे सीन शूट केले आहेत. आम्ही चर्चगेट परिसरातील घनश्याम मार्गावरील पारसी हॉस्पिटलमध्ये शूटिंग करत होतो. शाहरुखने शनिवारी संध्याकाळपर्यंत चित्रीकरण केले होते. नयनतारा रविवारच्या शेड्यूलला नव्हती. काही अॅक्शन सीनही चित्रीत करण्यात आले होते. शाहरुख पुन्हा कधी शूटिंग सुरू करणार याबाबत मला काहीही सांगितले गेले नाही. रविवारी शूटसाठी यायचे आहे, हा निरोप मला शनिवारी रात्री उशिरा मिळाला.'

'लॉयन'मध्ये काम करत आहे प्रशांत
प्रशांत सांगितले की, सेटवर सामान्य वातावरण होते. शाहरुखच्या आयुष्यात एवढे मोठे वादळ आले आहे, असे सेटवर वावरताना कुठेही जाणवले नाही. प्रशांतने सांगितल्यानुसार, तो सध्या शाहरुखसोबत केवळ 'लॉयन'चे शूटिंग करत आहे. त्याला 'पठाण'मध्ये कास्ट करण्यात आलेले नाही. दुसरीकडे, 'पठाण'शी संबंधित सूत्रांनीही यावर मौन बाळगले आहे. 10 ऑक्टोबरपासून या चित्रपटाचे स्पेनच्या मल्लोरका, कॅडिज आणि वेजर डेला फ्रंटेरा येथे होणार आहे. हे एकुण 21 दिवसांचे वेळापत्रक आहे. तेथील लोकेशन निश्चित झाले आहेत. आर्यन ड्रग प्रकरणामुळे आता यात काय बदल होईल का हे येणार काळच ठरवेल.

बातम्या आणखी आहेत...