आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्राच्या मधोमध रंगली पार्टी:क्रूझ रेव्ह पार्टीवर धाड पडण्याच्या काही मिनिटांपूर्वीचा व्हिडिओ आला समोर, डान्स आणि म्युझिकसह असा होता माहोल

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई ते गोवा क्रूझ शिपवर होणाऱ्या रेव्ह पार्टीत एनसीबीने धाड टाकली. त्यात प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर काही लोकांना अटक करण्यात आली. सिलेब्रिटीचा मुलगा असल्याने सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू आहे. आर्यनसह या प्रकरणात 8 जणांना अटक झाली. NCB ची धाड पडण्याच्या काही तासांपूर्वी क्रूझवर असलेल्या वातावरणाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

एनसीबीच्या धाडीच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वीचा हा व्हिडिओ मानला जात आहे. यामध्ये उच्चभ्रूंची मुले-मुली बेभान नाचताना दिसून आले. 8 जणांना पकडण्यात आले ते याच शिपमधून पकडले असा दावा केला जात आहे. एनसीबीने मात्र या व्हिडिओ संदर्भात काही अधिकृत खुलासा केलेला नाही.

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
NCB ने गुप्त माहितीच्या आधारे क्रूझवर धाड टाकली होती. अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, या क्रूझमधून पकडलेल्या आरोपींकडून 13 ग्राम कोकेन, 5 ग्राम एमडी, 21 ग्राम चरस, एमडीएमए (एक्स्टसी) च्या 22 गोळ्या आणि 1.33 लाख रुपये रोख हस्तगत केले आहे.

ड्रग पेडलर्सच्या संपर्कात आर्यन
NCB ने दिलेल्या माहितीनुसार आर्यन, अरबाज मर्चंट आणि एकूण 8 जणांना पकडून त्यांचे मेसेज चेक करण्यात आले. त्यामध्ये आर्यन काही ड्रग पेडलर्सच्या संपर्कात होता अशी माहिती समोर आली आहे. त्याच माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी आर्यन आणि अरबाज या दोघांना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी केली.

दरम्यान, आर्यनने यामध्ये स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला होता. आपल्याला एक गेस्ट म्हणून या क्रूझवर आमंत्रित करण्यात आले होते. यासाठी कुठल्याही प्रकारे पैशांचा व्यवहार झालेला नाही. माझ्या नावाचाच वापर करून लोकांना या पार्टीत बोलावण्यात आले होते असेही आर्यनने म्हटले होते. याचवेळी आर्यनने 4 वर्षांपूर्वी सुद्धा ड्रग्स घेतले होते असा खुलासा झाला. परंतु, ते कुठे घेतले याचा तपशील समोर आलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...