आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅकर्सच्या निशाण्यावर अमिषा:अभिनेत्री अमिषा पटेलचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक करुन डाटा केला डिलीट, मुंबई सायबर सेलने काही तासांतच अकाउंट केले रिकव्हर

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमिषाला मिळालेली लिंक ही नेदरलँडमधील असून IP ADDRESS हा तुर्कस्थानमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.

अभिनेत्री अमिषा पटेल ही हॅकर्सच्या निशाण्यावर आली आहे. मंगळवारी अमिषाचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले होते. अमिषाच्या एका चुकीमुळे तिच्यावर हा प्रसंग ओढावल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र सायबरने अमिषाचे अकाऊंट पूर्ववत करण्यासाठी तिची परवानगी घेत तपास सुरु केला आणि अवघ्या तासाभरात तिचे अकाउंट रिकव्हर केले.

एका लिंकवर क्लिक केल्याने झाले अकाउंट हॅक
एका गैरसमजामुळे अमिषाचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले होते. मुंबई सायबर सेलच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे की, 4 जानेवारी रोजी अमिषाला इंस्टाग्राम अकाउंटवर Account will be suspended within 24 hours for violating Instagram’s Copyright Law, हा मेसेज आला होता. या मेसेज बरोबर Copyright Objection Form असा मेसेज लिहून एक लिंक पण देण्यात आली होती. त्यामुळे अमिषाने या लिंकवर क्लिक केले आणि त्यानंतर एका तोतया इंस्टाग्राम वेबसाईटवर तिला डायरेक्ट केले गेले व लगेच काही वेळात तिचे अकाउंट लॉक झाले होते.

हॅकरने इंस्टाग्रामवरुन डाटा डिलीट केला

सायबर सेलच्या अधिका-याने सांगितल्यानुसार, हॅकरने अकाउंट ब्लॅक करुन त्यावरील सर्व डाटा डिलीट केला होता. आम्ही इंस्टाग्रामसोबत संपर्क साधून सर्व डाटा अकाउंटवर रिकव्हर केला आहे.

नेदरलँडमधून आली होती हँकिंगची लिंक
अधिका-याने पुढे सांगितल्यानुसार, अमिषाला मिळालेली लिंक ही नेदरलँडमधील असून IP ADDRESS हा तुर्कस्थानमधील आहे. अभिनेता शरद केळकरचेही अशाचप्रकारे अकाउंट हॅक झाले. त्याचे अकाउंट रिकव्हर करण्याचा प्रयत्न सुरु आहेत.

बातम्या आणखी आहेत...