आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण:भारती-हर्षला जामीन मिळवून देण्यात मदत? NCB चे दोन अधिकारी निलंबित, तपासादरम्यान अधिका-यांची भूमिका संशयास्पद

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली आहे.

बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणा-या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित केल्याचे वृत्त आहे. अद्याप या दोन्ही अधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली आहे. हे दोन्ही अधिकारी कॉमेडियन भारती सिंह आणि दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश या प्रकरणाशी संबंधित होते.निलंबनाबरोबरच या दोन्ही अधिकाऱ्यांच्या संशयास्पद भूमिकेची चौकशी करण्याचे आदेश ही समीर वानखेडे यांनी दिले आहेत.

NCB ला सरकारी वकिलावरही संशय

ड्रग्ज प्रकरणी अटक झालेल्या आरोपींची तत्काळ सुटका आणि इतर एका आरोपीवर कारवाई करण्यात दिरंगाई केल्याचा दावा या अधिकाऱ्यांविरोधात करण्यात आला आहे. या अधिकाऱ्यांसोबत विशेष सरकारी वकील अतुल सरपांडे यांना देखील भारतीच्या सुनावणीदरम्यान गैरहजर राहिल्याने निलंबित करण्यात आले आहे.

काय आहे भारती सिंहचे प्रकरण?

ड्रग्ज प्रकरणात कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना 21 नोव्हेंबर रोजी अटक झाली होती. 22 नोव्हेंबर रोजी त्यांना कोर्टात हजर केले असता दोघांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायालयीन कोठडी होताच दोघांनी तत्काळ जामिनासाठी अर्ज केला होता. विशेष म्हणजे दुसऱ्याच दिवशी त्यांना जामीन मिळाला. या जामीनाच्या सुनावणी वेळी सदर प्रकरणाशी संबंधित अधिकारी कोर्टात हजर झाला नाही. त्यामुळे भारतीच्या जामीन अर्जाला विरोध केला गेला नाही. तसेच, त्यांनी भारतीच्या जामीन अर्जाबाबत एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही कळवले नाही.

काय आहे करिश्मा प्रकाशचे प्रकरण?

करिश्मा प्रकाश हिच्या तपासाबाबतही संबंधित अधिकाऱ्याने आरोपीला सहकार्य होईल, या दृष्टीने काम केलं आहे. ड्रग्ज प्रकरण समोर आल्यावर अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिच्या घरीदेखील एनसीबीकडून धाड टाकण्यात आली होती. तिच्या घरातूनही ड्रग्ज जप् करण्यात आले होते. या प्रकरणी तिला अटक होणे आवश्यक होते. मात्र संबंधित अधिका-याने तिच्यावर तत्काळ कारवाई केली नाही. त्यामुळे या दोन्हीही संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

एनसीबीने केली भारती-हर्षचा जामीन रद्द करण्याची मागणी
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी विशेष एनडीपीएस न्यायालयात केली आहे. बॉलिवूडमध्ये ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणा-या एनसीबीने दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याऐवजी चौकशीसाठी एनसीबीच्या ताब्यात सोपवण्यात यावे, अशी मागणी केली आहे. न्यायालयाने मंगळवारी या संदर्भात भारती आणि हर्षला नोटीस पाठवली असून, या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser