आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टाकडून जामीन मिळाला आहे. एका महिन्यापासून तुरूंगात असलेल्या रियाची लोअर कोर्टाने दोनदा जामीन याचिका फेटाळून लावली होती, त्यानंतर तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर आज तिला दिलासा मिळाला. रियाला रियाची एक लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. आज सायंकाळी साडेपाच वाजता रिया भायखळा तुरुंगातून बाहेर आली.
Mumbai: Actor Rhea Chakraborty released from Byculla jail after a month.
— ANI (@ANI) October 7, 2020
She was granted bail by Bombay High Court in a drug-related case filed against her by Narcotics Control Bureau (NCB) pic.twitter.com/FlfP1re1cQ
कोर्टाने सांगितले- तुरुंगाबाहेर आल्यानंतर रियाला आपला पासपोर्ट जमा करावा लागेल. ती परवानगीशिवाय परदेशात जाऊ शकणार नाही. मुंबईबाहेर जाण्यापूर्वी तपास अधिका-यांना त्यासंदर्भात माहिती द्यावी लागेल. तसेच, 10 दिवसांत पोलिस ठाण्यात हजेरी लावणे अनिवार्य असेल. यापूर्वी सत्र न्यायालयाने मंगळवारी रियाच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची म्हणजे 20 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली होती.
या अटींसह रियाची सुटका
तुरुंगातील सुटका झाल्यानंतर 10 दिवस दररोज जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये सकाळी 11 वाजता हजेरी लावावी लागेल.
जामीनासाठी एक लाख रुपये भरावे लागतील.
पासपोर्ट जमा करावा लागेल.
कोर्टाच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊ शकणार नाही.
मुंबईतून बाहेर जाण्यासाठी तपासातील पाच अधिकाऱ्यांना माहिती द्यावी लागेल.
महीन्यातील पहिल्या सोमवारी रियाला एनसीबीच्या कार्यालयात हजेरी द्यावी लागेल.
या प्रकरणासंबंधीत कोणत्याही साक्षीदाराला भेटण्याची परवानगी नाही.
न्यायालयाच्या प्रत्येक सुनावणीदरम्यान रियाला हजर राहावे लागेल.
रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि अब्दुल बासित यांची जामीन याचिका फेटाळली
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलचा खुलासा झाल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) 8 सप्टेंबर रोजी रिया चक्रवर्तीला अटक केली होती. त्यानंतर तिची रवानगी भायखळा कारागृहात करण्यात आली होती. रियासह सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंत यांनाही मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि अब्दुल बासित यांची जामीन याचिका फेटाळण्यात आली आहे.
एनसीबीचा युक्तिवाद - रिया ड्रग्ज सिंडिकेट सक्रिय सदस्य
एनसीबीने रिया आणि शोविकच्या जामीनाला विरोध दर्शवला होता. रिया आणि शोविक ड्रग्ज सिंडिकेटचे सक्रिय सदस्य होते आणि हाय प्रोफाइल ड्रग पेडलर्सच्या संपर्कात होते, असे तपास यंत्रणेने कोर्टाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सोबतच त्यांच्यावर कलम 27 ए लागू करण्यात आला आहे, त्यामुळे त्यांना जामीन मिळू नये. एनसीबीने सांगितले की, रियाने ड्रग्ज खरेदी केल्याची कबुली दिली आहे. तिनेच सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत आणि शोविक यांना ड्रग्ज खरेदी करण्यास सांगितले होते.
रियाच्या वकिलांचा युक्तिवाद - सुशांत आधीपासूनच ड्रग्ज घेत असे
रिया सुशांतच्या आयुष्यात येण्यापूर्वीच तो ड्रग्ज घ्यायचा, असे रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी कोर्टात सांगितले होते. सुशांतला अमली पदार्थांचे व्यसन होते. रियासह आणखी दोन अभिनेत्रींनीदेखील याची कबुली दिल्याचे त्यांनी म्हटले. रियाप्रमाणेच श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांनीदेखील सुशांत 2019 पूर्वी ड्रग्ज घेत असल्याचे सांगितले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.