आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पा शेट्टीच्या घरी पोहोचले पोलिस:अभिनेत्रीकडे होणार पॉर्न प्रकरणाची चौकशी, आरोपी राज कुंद्राला सोबत घेऊन गेले मुंबई पोलिस

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिल्पा आणि राज यांची समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळतेय.

पॉर्न फिल्म रॅकेटप्रकरणी मुंबई पोलिसांची एक टीम अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या जुहूस्थित बंगल्यावर चौकशीसाठी पोहोचली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिस या प्रकरणी शिल्पा शेट्टीचीही चौकशी करतील. पॉर्न प्रकरणात अटकेत असलेला शिल्पाचा नवरा राज कुंद्रा यालादेखील पोलिस सोबत घेऊन गेले आहेत. शिल्पा आणि राज यांची समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळतेय.

दुसरीकडे राज कुंद्राने आपल्या अटेकविरोधात मुंबई उच्चन्यायालयाचे दार ठोठावले आहे. कुंद्राने त्याची अटक अवैध असल्याचे म्हटले आहे. त्याने आपल्या याचिकेत म्हटल्याप्रमाणे, पोलिसांनी अटक करण्यापूर्वी त्याला 41A ची नोटिस दिली नव्हती. 41A ही नोटिस पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी असते. जर संबंधित व्यक्तीने या नोटिसचे पालन केले तर त्याला अटक केली जात नाही, केवळ चौकसीसाठी बोलावले जाते.

तत्पूर्वी शिल्पा शेट्टीला चौकशीसाठी समन्स बजावणार नसल्याचे मुंबई पोलिसांच्या एका सूत्राने न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. सूत्रांनी सांगितल्यानुसार, अभिनेत्री शिल्पा शेट्टी वियान इंडस्ट्रीजच्या गुंतवणूकदारांपैकी एक आहे. मुंबई पोलिस सध्या केनरीन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा तपास करत आहेत. 'केनरिन' ही यूकेस्थित कंपनी असून हॉटशॉट्स अ‍ॅप याच कंपनीचे आहे. पॉर्न व्हिडिओंच्या वितरणाचे काम राज कुंद्रा केनरिन या कंपनीच्या माध्यमातून करत असे. मात्र आता पोलिस शिल्पा आणि राज यांची एकत्र चौकशी करत आहेत.

न्यायालयाने 27 जुलैपर्यंत वाढवली राज कुंद्राची पोलिस कोठडी
राज कुंद्राला आज (23 जुलै) मुंबईच्या मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. कोर्टाने 27 जुलैपर्यंत त्याच्या पोलिस कोठडीत वाढ केली आहे. राज कुंद्रासह त्याचा सहकारी रेयान थार्प यांच्याही पोलिस कोठडीत 27 जुलैपर्यंत वाढ झाली आहे. आज कुंद्राला कोर्टात हजर केल्यानंतर मुंबई पोलिसांनी कोर्टाकडे अधिक वेळ मागितला होता. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण खूप मोठे आहे, ते केवळ अश्लील चित्रपटांपुरते मर्यादित नाही. आरोपी हे संघटित पद्धतीने चालवत होते. पॉर्न चित्रपटांच्या व्यवसायातून आलेल्या पैशांचा वापर ऑनलाइन सट्टेबाजीसाठी होत असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळेच राज कुंद्राचे येस बँक खाते आणि युनायटेड बँक ऑफ आफ्रिका खात्यामधील व्यवहार तपासले गेले पाहिजेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

19 जुलै रोजी झाली राज कुंद्राला अटक

19 जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावले होते. तो रात्री 9 वाजता मुंबई गुन्हे शाखेच्या भायखळा कार्यालयात पोहोचला होता. सुमारे दोन तासांच्या चौकशीनंतर रात्री अकरा वाजता त्याला अटक करण्यात आली होती. 20 जुलै रोजी त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. तेव्हा कोर्टाने 23 जुलैपर्यंत त्याला कोठडी सुनावली होती. आता त्याच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

या प्रकरणात कुंद्रासह 11 जणांना अटक करण्यात आली आहे. कुंद्राच्या मेहुण्यासह अन्य काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

राज कुंद्राचा मेहुणा केनरीन कंपनीचे मालक
राज कुंद्रा यांचा मेहुणा प्रदीप बक्षी हा ब्रिटिश नागरिक असून केनरिन कंपनीचे मालक आहे. प्रदीप बक्षीचे राजच्या बहिणीशी लग्न झालेा आहे. प्रदीप बक्षी हा केनरीन कंपनीचा चेअरमनसुद्धा आहे. 2019 मध्ये राज कुंद्राने 'हॉटशॉट्स' हे अॅप जवळपास 18 लाखांत केनरिन कंपनीला विकले होते. पोर्नोग्राफीसंबंधित प्रकरणात या कंपनीला थेट जबाबदार धरण्यात आले आहे. अलीकडेच, गुन्हे शाखेच्या सहआयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "केनरीन लंडनस्थित कंपनी असली, तरी अश्लील व्हिडिओ तयार करणे, ते अ‍ॅपद्वारे स्ट्रीम करणे आणि अकाउंटिंग राज कुंद्राच्या 'वियान इंडस्ट्रीज'च्या माध्यमातून करण्यात आले आहे."

बातम्या आणखी आहेत...