आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईतील अतिमुसळधार पावसाचा परिणाम:ड्रग्ज प्रकरणातील एनसीबीची कारवाई, रिया चक्रवर्तीच्या जामीन अर्जावरची आणि कंगनाच्या ऑफिस तोडफोड प्रकरणाची सुनावणी सर्वच थांबले

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिया चक्रवर्तीच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार नाही

मंगळवारी संध्याकाळपासून मुंबई-ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचे धुमशान सुरू आहे. मुसळधार पावसाने अख्खी मुंबई पाण्याखाली गेली आहे. रात्रभर अतिमुसळधार पाऊस पडल्याने मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे बीएमसीने सर्व खासगी आणि सरकारी कार्यालयांना सुटी जाहीर केली आहे. शिवाय सरन्यायाधीशांनी आज मुंबई उच्च न्यायालयात सुटी जाहीर केली असून उद्या म्हणजे 24 सप्टेंबर रोजी कामकाज सुरु होईल, असे सांगण्यात आले आहे.

रिया चक्रवर्तीच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार नाही
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर तुरुंगात असलेल्या रिया चक्रवर्तीच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र न्यायालयाला आज सुट्टी जाहीर झाल्याने ही सुनावणी आज होणार नाहीये. मंगळवारी विशेष एनडीपीएस कोर्टाने तिच्या न्यायालयीन कोठडीत 6 ऑक्टोबर पर्यंत वाढ केली आहे. त्यानंतर तिने जामिनसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण आजची सुनावणी रद्द झाल्याने पुढची तारीख मिळेपर्यंत तिला प्रतीक्षा करावी लागणार आहे.

एनसीबीची चौकशी झाली प्रभावित
बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्नश आता सेलिब्रिटींपर्यंत येऊन पोहोचले आहे. यात दीपिका पदुकोणसह अनेक मोठी नावे समोर आली आहेत. याचप्रकरणात उडता पंजाब या चित्रपटाचा सहनिर्माता मधु मांटेना याचेही नाव पुढे आले आहे. एनसीबीने आज मधु मांटेनाला चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र मुंबईत सुरु असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे एनसीबीच्या कामकाजावरही परिणाम झालेला दिसून येतोय. एनसीबीच्या अधिका-यांनी म्हटल्यानुसार, आम्ही गेस्ट हाऊसमध्ये आहोत. चौकशीत सामील होण्यासाठी बोलावलेल्या व्यक्तींना सद्यपरिस्थितीमुळे येणे शक्य होत नसेल तर त्यांची चौकशी उद्यासाठी लांबणीवर टाकली जाईल. त्यामुळे मधु मांटेनासह ड्रग्ज कनेक्शनमध्ये समन्स बजावलेल्यांची आज चौकशी होणे अशक्य दिसतंय.

कंगना रनोटच्या याचिकेवरची सुनावणीही रद्द
कंगना रनोटच्या पालीहिलस्थित ऑफिसमध्ये 9 सप्टेंबर रोजी बीएमसीने केलेल्या तोडफोडीनंतर मुंबई उच्च न्यायलयात तिच्यावतीने याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. त्यानंतर आज पुन्हा सुनावणी होणार होती. मात्र न्यायालयाला सुट्टी असल्याने ही सुनावणी आज होऊ शकणार नाहीये.

बातम्या आणखी आहेत...