आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोर्नोग्राफी प्रकरण:राज कुंद्राला दिलासा नाही, न्यायालयाने राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांचा जामीन अर्ज फेटाळला

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज कुंद्राने दाखल केली होती याचिका

पोर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेल्या राज कुंद्राला अद्याप दिलासा मिळालेला नाही. मुंबईच्या कोर्टाने राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रायन थोर्पे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. एक दिवस आधी, म्हणजे मंगळवारी त्याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असल्याने राज कुंद्राची चौकशी करण्यासाठी सात दिवसांचा पोलिस रिमांड मागितला होता. मात्र, कोर्टाने तिसऱ्यांदा रिमांड मंजूर करण्यास नकार दिला होता.

म्हणूनच राज कुंद्राने दाखल केली होती याचिका

राज कुंद्राच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले गेले होते की, अश्लील कंटेट बनवणे आणि ते विविध माध्यमांवर रिलीज करण्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अनेकांना अटक झाली आणि त्यानंतर जामीनावर त्यांची सुटकाही करण्यात आली. 19 जुलै रोजी राज कुंद3ाच्या ऑफिसची झडती घेतल्यानंतर गुन्हे शाखेने त्याचे विधान नोंदविण्याच्या बहाण्याने त्याला भायखळा कार्यालयात बोलावले होते, मात्र तेथे पोहोचल्यावर त्याला अटक करण्यात आली, असे या याचिकेत म्हटले गेले आहे.

आरोपपत्रात उघडली गेली कुंद्राची अनेक रहस्ये
पहिली चार्जशीट दाखल झाल्यानंतर पोर्न फिल्म व्यवसायाबाबत बर्‍याच गोष्टी चर्चेत आल्या आहेत. राज कुंद्राने आपल्या कंपनीसाठी लक्ष्य ठेवले होते. 2023 पर्यंत या प्रौढ चित्रपटांमधून 34 कोटी रुपये कमविण्याचे त्याचे लक्ष्य होते. 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 146 कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे त्याने ठरवले होते. यामध्ये 34 कोटींचा निव्वळ नफा कमवण्याचीही तयारी होती.

पूर्ण नियोजन 3 वर्षांचे होते
आरोपपत्रात 2021-2022 आणि 2022-2023 या वर्षांच्या कमाईच्या अंदाजाचा तपशील देखील आहे. राज कुंद्राची कंपनी 21-22 मध्ये या व्यवसायातून 36.50 कोटी रुपये रेव्हेन्यू आणि 4.76 कोटी रुपये नफा कमावण्याची योजना आखत होती. तर 2022-2023 साठी 73 कोटी रुपये ग्रॉस रेव्हेन्यूचे त्यांचे टार्गेट होते.

बातम्या आणखी आहेत...