आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुमताज यांना पतीकडून वाढदिवशी मिळाली खास भेट:मयूर माधवानी यांनी पत्नीला गिफ्ट केली मर्सिडीज कार आणि दागिने

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लग्नानंतर लंडनला स्थायिक झाल्या मुमताज

ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांनी नुकताच त्यांचा 75 वा वाढदिवस साजरा केला. त्यांचे पती आणि उद्योगपती मयूर माधवानी यांनी युगांडामध्ये त्यांच्या पत्नीसाठी एका ग्रँड लंचचे आयोजने केले होते, यावेळी त्यांच्या दोन मुली देखील उपस्थित होत्या. एका मुलाखतीत, मुमताज यांनी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणती खास भेटवस्तू मिळाली, याचा खुलासा केला. पती मयूर यांनी यंदा वाढदिवशी भेट म्हणून दागिने आणि एक मर्सिडीज कार दिली असल्याचे मुमताज यांनी सांगितले आहे.

मुमताज यांच्या पतीने वाढदिवसानिमित्त मर्सिडीज कार गिफ्ट केली
मुमताज यांनी ETimes ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे संपूर्ण कुटुंब तिथे उपस्थित होते. जेव्हा त्यांना त्यांच्या पतीने वाढदिवसा निमित्त कोणती खास भेटवस्तू दिली, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्या म्हणाल्या, "प्रॅक्टिकली त्यांनी मला आयुष्यातील सर्व काही दिले आहे. जर तुम्ही या वाढदिवसाच्या भेटवस्तूबद्दल विचारत असाल तर, त्यांनी मला मर्सिडीज कारचे लेटेस्ट मॉडेल गिफ्ट केले आहे. तसेच, त्यांनी भेट म्हणून दागिने देखील दिले आहेत," असे मुमताज यांनी सांगितले.

इंडस्ट्रीत असताना स्वतःचे चित्रपट बघायलाही वेळ मिळत नव्हता - मुमताज
मुमताज यांनी सांगितले की, जेव्हा त्या हिंदी चित्रपटसृष्टीत होत्या तेव्हा त्यांना वाढदिवशी देखील स्वतःसाठी वेळ मिळत नव्हता. चित्रपटाच्या सेटवर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनबद्दल बोलताना मुमताज म्हणाल्या, "प्रत्येक वेळी चित्रपटाच्या सेटवर केक मागवला जात होता आणि सर्व जण माझ्यासाठी टाळ्या वाजवत असे. पण मी माझ्या कारकिर्दीत इतकी बिझी राहिले की सेलिब्रेशन करणे तर दूरच. कधी कधी मला माझे रिलीज झालेले चित्रपट बघायलाही वेळ मिळत नसायचा," असे त्या सांगतात.

मुमताज स्वतःला 18 वर्षांची असल्याचे समजतात
मुमताज पुढे म्हणाल्या, "मला अजूनही वाटते की मी 18 वर्षांची आहे. मी अजूनही नृत्य करते. मी दररोज 90 मिनिटे व्यायाम करते." मुमताज सध्या त्यांचे कुटुंब आणि नातवंडांसह युगांडामध्ये आहे. भारतात येण्याच्या प्रश्नावर त्या म्हणाली की, कदाचित त्या ऑक्टोबरमध्ये भारतात येऊ शकतात.

वयाच्या 27 व्या वर्षी लग्न करून इंडस्ट्रीला केले होते अलविदा
मुमताज या त्यांच्या काळातील सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे. 'दो रास्ते', 'बंधन', 'आदमी और इन्सान,' 'सच्चा झूठा', 'खिलौना,' 'तेरे मेरे सपने,' 'हरे रामा हरे कृष्णा,' 'अपना देश,' 'लोफर' 'चोर मचाये शोर' आणि 'नागिन' सारखे सुपरहिट चित्रपट त्यांनी आपल्या करिअरमध्ये दिले आहेत. त्यांनी वयाच्या 11 व्या वर्षी बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली. आणि वयाच्या 27 व्या वर्षी त्यांनी चित्रपटसृष्टीला अलविदा केले होते. मुमताज यांनी युगांडाच्या बिझनेसमनशी लग्न केल्यानंतर आपल्या कुटुंबाला वेळ देण्याचा निर्णय घेतला होता.

लग्नानंतर लंडनला स्थायिक झाल्या मुमताज
लग्नानंतर मुमताज कुटुंबासह लंडनला शिफ्ट झाल्या. त्या अधूनमधून त्यांच्या इंडस्ट्रीतील मित्रांना भेटण्यासाठी भारतात येत असतात. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांनी शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबीयांची अचानक भेट घेतली होती. संजय लीला भन्साळी यांच्या हीरा मंडी या वेब सिरिजमध्ये मुमताज मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...