आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगनाच्या अडचणीत वाढ:ऑफिसनंतर आता कंगना रनोटच्या खारमधील फ्लॅटवर कारवाईसाठी महापालिकेची पावले, अनधिकृत बांधकामावर होऊ शकते कारवाई

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोर्टाने स्टे उठवल्यास ऑफिसपाठोपाठ कंगनाच्या राहत्या घरावरही पालिकेची कारवाई होण्याची शक्यता

अभिनेत्री कंगना रनोटच्या मुंबईतील पालीहिल स्थित मुंबईतील कार्यालयावर बीएमसीचा हातोडा पडला. ही कारवाई सकाळी 10.30 वाजता सुरू झाली आणि दुपारी 12.40 पर्यंत चालली. या ऑपरेशन दरम्यान, बाल्कनी आणि कार्यालयाच्या बाहेरील बाजूचे बांधकाम तोडण्यात आले आहे. यावेळी जवळपास राहणा-या काही लोकांनी या तोडफोडीला विरोधही केला होता. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत पालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी गुरुवारी दुपारी तीन वाजता होईल.

  • आता राहत्या घरावर होणार कारवाई?

आता मुंबईतील खार रोड पश्चिम भागात 16 व्या रोडवर डिब्रीझ अपार्टमेंटमध्ये सातव्या मजल्यावरील कंगनाच्या राहत्या फ्लॅटमध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामावरही पालिका कारवाई करु शकते.

  • काय आहे हे प्रकरण?

या फ्लॅटमध्ये एफएसआयचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने 2018 मध्ये कंगनाला एमआरटीपी नोटीस दिली होती. मुंबई महापालिकेच्या एमआरटीपी नोटीस विरोधात तिने दिंडोशी कोर्टात दाद मागितली होती. त्यावेळी कोर्टाने कंगनाची बाजू ऐकून घेत पुढील कारवाईस स्टे दिला होता, तर पालिकेला यावर सविस्तर बाजू मांडण्यास सांगितले होते.

गेल्या दोन वर्षात पालिकेने काहीच म्हणणे कोर्टात मांडले नव्हते, परंतु आता कंगनाला घेरण्यासाठी दोन दिवसांपूर्वी कोर्टात पालिकेने आपले म्हणणे मांडले आहे. तसंच या प्रकरणी दिलेली स्थगिती मागे घेण्याची विनंती कोर्टाला केली आहे. त्यामुळे कोर्टाने स्टे उठवल्यास ऑफिसपाठोपाठ कंगनाच्या राहत्या घरावरही पालिकेची कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.