आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुःखद:अनु मलिकला मातृशोक, बिल्किस यांनी वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा निरोप, नातू अरमान आणि अमल यांनीही इमोशनल पोस्ट शेअर करत व्यक्त केले दुःख

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिल्किस मलिक यांनी रविवारी (25 जुलै) दुपारी 3.30 वाजता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

संगीतकार अनु मलिकची आई बिल्किस मलिक यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले आहे. वृत्तानुसार बिल्किस मलिक यांनी रविवारी (25 जुलै) दुपारी 3.30 वाजता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर सांताक्रूझ कब्रस्तानात त्यांचा दफनविधी करण्यात आला.

अनु मलिक, अबु मलिक आणि डबु मलिक यांच्या मातोश्री बिल्किस यांना हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी जुहूच्या आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संगीतकार अमल आणि अरमान मलिक यांनी आजी बिल्किस यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत सोशल मीडियावर एक इमोशन नोट शेअर केली आहे.

मी माझा सर्वात चांगला मित्र गमावला
अरमान मलिकने त्याची बिल्किस यांच्याबरोबरचे दोन व्हिडिओ आणि एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, "आज मी माझा सर्वात चांगला मित्र... माझी आजी गमावली. माझ्या आयुष्यातून प्रकाश निघून गेला आहे. मला अजूनही विश्वास बसत नाहीये. आता एक पोकळी निर्माण झाली आहे, जी कधी कुणीही भरून काढू शकत नाही. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की मला आजीसोबत इतका वेळ घालवायला मिळाला. देवा माझी एंजल आता तुझ्याबरोबर आहे," अशा शब्दांत अरमानने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

तर अमालने लिहिले, ‘मला तुला भेटायचे होते.. पण तू आम्हाला सोडून गेलीस. मी आकाशाकडे पाहिले आणि तू तिकडेच आहेस असे मला जाणवले.’ बिल्किस या प्रसिद्ध कवी आणि गीतकार हसरत जयपुरी यांच्या भगिनी होत्या.

बातम्या आणखी आहेत...