आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलशन कुमार हत्या प्रकरण:गुलशन कुमार हत्या प्रकरणात अडकलेले नदीम म्हणाले, 'मला अडकवण्यात आले, भारतात येऊन मला माझे निर्दोषत्व सिद्ध करायचे आहे'

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1997 मध्ये झाली होती गुलशन कुमार यांची हत्या

गुलशन कुमार हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. संगीतकार नदीम सैफी यांच्यावर गुलशन कुमार यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता. या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर नदीम इंग्लंडला पळून गेले. 2002 मध्ये एका भारतीय न्यायालयाने पुराव्याअभावी हत्येत त्यांच्या सहभाग असल्याचा त्यांच्यावरील खटला रद्द केला, परंतु त्यांचे अटक वॉरंट मागे घेण्यात आले नाही, ज्यामुळे नदीम अजूनही अडचणीत आहेत. एका मुलाखतीत नदीम यांनी या प्रकरणाबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत नदीम म्हणाले, 'सुरुवातीला मला वाटले होते की हा एक गैरसमज आहे जो लवकरच दूर होईल. परंतु कोणीही विचार केला नाही की सर्वकाही इतक्या वाईट टप्प्यावर येईल. पापाजींना (गुलशन ग्रोवर) मी लहान भावासारखा होतो. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. मला भारतात परत यायचे आहे जेणेकरून मी स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकेन. मी अनावश्यक वनवास अनुभवला आहे. ज्या व्यक्तीने भारतातील आणि आशियाई लोकांचे इतके मनोरंजन केले त्या व्यक्तीवर इतका मोठा अन्याय झाला आहे.'

मला अडकवले गेले
या प्रकरणात तुम्हाला गोवण्यात आले आहे असे वाटते का, असा प्रश्न मुलाखतीत नदीम यांना विचारला गेला असता ते म्हणाले, 'मला गोवण्याचे षडयंत्र रचले गेले होते. यूके उच्च न्यायालय, यूके सर्वोच्च न्यायालय, द हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि अगदी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती एमएल तहिलयानी यांनीही माझ्याविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याची पुष्टी केली होती. माझ्यावर खूप अन्याय झाला. माझा कायद्यावर विश्वास आहे.

परतण्याच्या तयारीत आहे नदीम

नदीम पुढे म्हणाले की, त्यांना संगीत क्षेत्रात पुनरागमन करण्याच्या अनेक ऑफर्स येत आहेत. या ऑफर चित्रपटांपासून ते कॉन्सर्टपर्यंतच्या आहेत. नदीम म्हणाले, मला आनंद आहे की लोक माझ्यासोबत काम करू इच्छितात, परंतु 25 वर्षे अज्ञातवासात घालवल्यानंतर मला एक गोष्ट समजली आहे की, आपल्या योजना फक्त स्वत: पुरत्याच मर्यादित ठेवाव्यात. मला वाईट नजरेची भीती वाटते.

1997 मध्ये झाली होती गुलशन कुमार यांची हत्या

गुलशन यांची 12 ऑगस्ट 1997 रोजी मुंबईतील दक्षिण अंधेरी भागात असलेल्या जितेश्वर महादेव मंदिराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अबू सलेमने गुलशन कुमार यांना दरमहा 5 लाख रुपये देण्यास सांगितले होते. गुलशन कुमार यांनी त्यासाठी नकार देत एवढ्या पैशांत वैष्णोदेवीमध्ये भंडारा आयोजित करणार असल्याचे सांगितले होते. याचा राग येऊन सलेमने शूटर राजामार्फत गुलशन कुमार यांची दिवसाढवळ्या हत्या केली.

भारत सरकारने माफी द्यावी अशी मागणी केली होती

काही वर्षांपूर्वी नदीम यांनी भारत सरकारने त्यांना माफी द्यावी अशी मागणी केली होती. आईवडिलांनी आपल्याला निर्दोष म्हणून पाहावे, अशी त्यांची इच्छा होती. नदीम या प्रकरणात अडकल्यानंतरच त्यांची श्रवण यांच्यासोबतची जोडी तुटली आणि त्यानंतर 2005 मध्ये आलेल्या 'दोस्ती: फ्रेंड्स फॉरएव्हर'नंतर त्यांनी कोणत्याही चित्रपटात एकत्र संगीत दिले नाही.

या चित्रपटांना दिले होते संगीत

नदीम-श्रवण या जोडीने 'आशिकी', 'साजन', 'दिल है की मानता नहीं', 'दीवाना', 'सडक', 'सैनिक', 'दिलवाले', 'राजा हिंदुस्तानी', 'फूल और कांटे' आणि 'परदेस', 'ये दिल आशिकाना', 'राज', 'कयामत', 'दिल है तुम्हारा', 'बेवफा' आणि 'बरसात', 'धडकन' अशा अनेक चित्रपटांना संगीत देऊन यश मिळवले होते. श्रवण यांचे यावर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.

बातम्या आणखी आहेत...