आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हेल्थ अपडेट:व्हेंटीलेटरवर आहेत नदीम श्रवण या संगीतकार जोडीतले श्रवण राठोड, मित्र समीर अनजान भावूक होऊन म्हणाले - त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे

राजेश गाबा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन दिवसांपासून रुग्णालयात आहेत श्रवण राठोड

नदीम श्रवण संगीतकार जोडीतले श्रवण राठोड यांना कोरोनाची लागण झाली आहे. श्रवण यांना कोरोनाची लागण झाल्याने मुंबईच्या एस.एल. रहेजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजत आहे. त्यांना इतरही काही आजार असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यांच्या प्रकृतीविषयी त्यांचे मित्र आणि गीतकार समीर अनजान यांनी अपडेट दिले आहे.

दिव्य मराठीसोबत झालेल्या संभाषणात समीर यांनी सांगितले, "श्रवण यांची प्रकृती गंभीर आहे. ते व्हेंटीलेटरवर आहेत. त्यांच्या मूत्रपिंडावरही गंभीर परिणाम झाला आहे. कोरोनाने त्यांच्या शरीरातील सर्व भागांवर परिणाम केला आहे. रहेजा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, त्यांचे डायलिसिस करावे लागले. आमचा भाऊ श्रवण लवकर बरा व्हावा, यासाठी आम्ही सर्वजण प्रार्थना करत आहोत," असे समीर अतिशय भावूक होऊन म्हणाले.

श्रवण यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा : समीर

समीर पुढे म्हणाले, "तुम्हीही सर्वजण प्रार्थना करा. कारण प्रार्थनेत मोठी शक्ती असते. मी माझ्या मुस्लिम बांधवांना आणि मित्रांना देखील माझ्या मित्रासाठी प्रार्थना करण्यास सांगितले आहे. संपूर्ण देश जे श्रवण यांच्या संगीतावर आणि त्यांच्यावर प्रेम करतात ते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे. डॉक्टर त्यांचे काम करीत आहेत. आता सर्व काही देवाच्या हातात आहे. ते लवकरात लवकर बरे होऊन घरी परततील, अशी आम्हाला आशा आहे."

तीन दिवसांपासून रुग्णालयात आहेत श्रवण राठोड
90 च्या दशकातील लोकप्रिय संगीतकार जोडी नदीम-श्रवण यांच्यातील श्रवण (67) हे तीन दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची कोविड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. श्रवण राठोड यांचा मुलगा आणि संगीतकार संजीव राठोड यांनी सोमवारी दिव्य मराठीला सांगितले, "कोविडमुळे वडिलांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. त्याला लंग्स आणि हॉर्ट प्रॉब्लेम आहे. फुफ्फुसांमध्ये पाणी भरले आहे. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आम्ही कुटुंबासह रुग्णालयातच आहोत. सर्व जण खूप तणावात आहे," असे संजीव यांनी सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...