आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील आघाडीचे OTT प्लॅटफॉर्म MX Player चे दुसऱ्या OTT प्लॅटफॉर्ममध्ये विलीनीकरण झाल्याची बातमी आहे. माहितीनुसार, हे एकत्रीकरण Amazon किंवा Netflix सोबत होऊ शकते. याबाबतची कागदपत्रही तयार झाली आहेत. पण याला अधिकृत दुजोरा मिळणे बाकी आहे.
आता एमएक्स प्लेअर का बंद होत आहे, यावर ट्रेड एक्सपर्टही आपले मत मांडत आहेत. प्रसिद्ध व्यापार तज्ज्ञ गिरीश वानखेडे सांगतात, हे ओटीटी प्लॅटफॉर्म बंद होणार किंवा अन्य कोणत्या प्लॅटफॉर्मसोबत तरी विलीन होणार, अशा बातम्या आधीच येत होत्या. MX Takatak गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये Sharechat मध्ये विलीन झाले.
अधिक अश्लील कंटेंटमुळे जाहिरातदार दुरावले?
एमएक्स प्लेयरच्या बिझनेस मॉड्यूलवर गिरीश पुढे सांगतात, जी त्यांची पेरंट कंपनी आहे, त्यांच्याकडे जाहिरातदारांच्या रांगा आहेत. ते सर्व चांगल्या कंटेंटला स्पॉन्सर करतात. MX Player ने प्रेक्षक मिळवण्यासाठी प्रथम प्रीमियम श्रेणी लाँच केली. त्यानंतर प्रीमियम श्रेणीतील शो मोठ्या किमतीत विकले गेले. यात अचडण अशी होती की, त्यांच्याकडे अश्लील कंटेंटचा भडीमार होती.
बालीजीचा अश्लिल कंटेंट MX Player संपादित केला. अशा स्थितीत पेरेंट कंपनीचे जे जाहिरातदार होते, ते MX Player शी संबंध ठेवण्यास टाळाटाळ करू लागले. MX Player चा गेल्या दोन ते तीन वर्षात फक्त मूठभर कंटेंट आहे, जो चांगल्या दर्जाचा आहे. आश्रम, शिक्षा मंडळ, भौकाल ही त्यांच्या गाजलेल्या शोजची नावे आहेत.
क्वालिटी कंटेंटचा अभाव हे नुकसानाचे प्रमुख कारण बनले
व्यापार तज्ज्ञ गिरीश यांच्या मते, फ्री सबस्क्रिप्शन मॉडेलमुळे फक्त तोटा होतो. गिरीश यांच्या म्हणण्यानुसार, प्लॅटफॉर्मने त्याचा प्रीमियम कंटेंट पाहण्यासाठी ईमेलची अटदेखील शिथील केली. अशा परिस्थितीत, विश्वासू आणि सब्सक्राइबर एमएक्स प्लेयरपासून वेगळे केले गेले. राहिला प्रश्न प्रीमियम कॅटेगरीचा तर यात मोजकाच कंटेंट प्रेक्षकांना गुंतवून ठेवू शकला.
त्यांच्याकडे यूएस, कोरिया इत्यादी देशांच्या डब केलेल्या व्हर्जनचा कंटेंट बाकी आहेत. त्यांना बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्या मर्यादित आहे. एमएक्स प्लेयरने क्वालिटी कंटेंटवर भर दिला पाहिजे.
उदाहरणार्थ, अमेझॉन प्राइमकडे विनामूल्य कंटेंटसाठी अमेझॉन मिनी आहे. सब्सक्रिप्शसाठी प्राइम व्हिडिओ आहे. फ्री कंटेंटमध्येही त्यांनी निस्तेज कंटेंट भरला नाही. दर्जेदार कंटेंटवर लक्ष केंद्रित केले. MX Player कदाचित येथेच चुकले असावे. आता या गोष्टीचा फटका त्यांना सहन करावा लागत आहे.
MX Player मोठ्या OTT कंपन्यांसह व्यवसायाच्या संधीच्या शोधत?
काही व्यापार तज्ज्ञ MX Player च्या ताकदीचा दावा करतात. तज्ज्ञ म्हणतात, 'एकत्रीकरणासाठी दोन ते तीन महिने लागतील. MX Player दोन मोठ्या OTT प्लॅटफॉर्मसह व्यवसायाच्या संधी शोधत आहे.
'जख्म' या वेब सिरीजचा दुसरा सीझन येत आहे. याशिवाय बिग बजेट ओरिजिनल शोदेखील दोन ते तीन महिन्यांत जाहीर होणार आहेत. आश्रमाचा पुढचा सिझन कधी येणार यावर चर्चा सुरू आहे. सुनील शेट्टीच्या वॉरियर हंट आणि धारावी बँकेचे एमएक्स प्लेअरसोबत कोलॅबरेशन होते.'
देश, परदेशासह 600 मिलियन अॅक्टिव यूजर्स
MX Player च्या समर्थनार्थ तज्ज्ञ म्हणतात, 'राहिला प्रश्न स्लीझी कंटेंटचा तर लॉकडाऊन नंतरच त्यात बदल झाला होता. MX Player कोविडच्या आधी सुरू झाला होता. त्यानंतर लॉकडाऊन आला. अशा परिस्थितीत, ओरिजिनल कंटेंट तयार करण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही. परिणामी, कंटेंट इतर OTT किंवा उत्पादकांकडून मिळवावा लागला.'
अर्थात, असा मजकूर घेण्यात आला जेणेकरून मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांना लक्ष्य करता येईल. पण लॉकडाऊन उठताच हा सर्व कंटेंट हटवण्यात आले. MX Player चे भारतात 250 मिलियन हून अधिक तर परदेशात 350 मिलियन अॅक्टिव यूजर्स आहेत. एमएक्स क्रॉसओव्हर वैशिष्ट्य देखील लोकप्रिय ठरले आहे. गेल्या वर्षीच तीन मोठे प्रोजेक्ट या प्लॅटफॉर्मवर आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.