आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानुकतीच 95 व्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा झाली. यंदाचा हा सोहळा भारतासाठी अतिशय खास ठरला. या सोहळ्यात एस.एस. राजामौली दिग्दर्शित आरआरआर या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याने बेस्ट ओरिजिनल साँग श्रेणीत पुरस्कार पटकावला आहे. भारताला पहिल्यांदाच नाटू नाटू या गाण्याच्या निमित्ताने या श्रेणीत ऑस्कर मिळाला आहे. ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्कर मिळाल्यावर संगीतकार एम एम किरवानी यांनी तेलुगू भाषेतील या गाण्याचा खरा अर्थ व त्यासाठी प्रेरणा कुठून मिळाली हे सांगितले आहे.
एम. एम. किरवानी यांनी सांगितल्यानुसार, ‘नाटू नाटू’ हे भारतीय चित्रपटाचे आणि दक्षिणात्य संगीताचे शुद्ध व मूळ रूप दर्शवणारे गाणे आहे. याला एका प्रकारचा रस्टिक लूक आहे. गाण्याची प्रेरणा कुठून मिळाली हे सांगताना चंद्रबोस यांनी हे सर्व आपल्या गावी आलेल्या अनुभवाचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे.
'नाटू नाटू’ या गाण्याचा मराठी अर्थ
‘नाटू नाटू’ गाण्यातील नाटू याचा मराठीत अर्थ डान्स असा होतो. या गाण्यात चला सगळे मिळून नाचूया असे म्हणत सुरुवात केली आहे आणि मग सर्व कडव्यांमध्ये नाचण्यात कशी ऊर्जा हवी हे सांगितले आहे. गाण्याच्या सुरुवातीचे शब्द म्हणजे 'ना पाटा सोडू' याचा अर्थ म्हणजे 'माझे गाणे ऐका आणि नाचायला या.'
पहिल्या कडव्यात तुम्ही प्राणीपक्षी जसे बिनधास्त आकाशात झेप घेतात तसे नाचा असे म्हटले आहे. दुसऱ्या कडव्यात ढोल व ताशांच्या गजरात एकरूप होऊन नाचा असे म्हटले आहे. तर तिसऱ्या कडव्यात तुम्ही असे नाचा की पृथ्वीवरची धूळ आकाशापर्यंत पोहोचली पाहिजे असे म्हटले आहे.
'RRR' चित्रपटातील 'नाटू-नाटू' या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. 2008 मध्ये 'स्लमडॉग मिलेनियर' चित्रपटातील 'जय हो' या गाण्यासाठी एआर रहमान यांना शेवटच्या वेळी सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी ऑस्कर जिंकला होता. 15 वर्षांनंतर भारताला हा पुरस्कार मिळाला आहे. वाचा या गाण्याची रंजक कथा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.