आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफवा:'ओ सनम' फेम गायक लकी अलीचे कोरोनामुळे निधन झाल्याचे चुकीचे वृत्त व्हायरल, जवळची मैत्रीण नफीसा म्हणाल्या - 'तो अगदी बरा आहे आणि कुटुंबासह फार्महाऊसवर आहे'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लकी अली दीर्घ काळापासून प्रकाशझोतात नाहीत. मात्र आजही त्यांची गाणी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

प्रसिद्ध गायक लकी अली यांचे निधन झाल्याच्या अफवा मंगळवारी संध्याकाळपासून सोशल मीडियावर सुरु होत्या. कोरोनामुळे त्यांचे निधन झाल्याचे म्हटले जात होते. दरम्यान लकी अली यांची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री नफीसा अली यांनी एक पोस्ट शेअर करत या सर्व अफवा असल्याचे सांगितले आहे. लकी अली ठीक असून आपल्या कुटुंबासह बंगळुरुच्या फार्म हाऊसवर असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

​​​​​​लकी यांना कोविड नाही, त्यांची प्रकृती उत्तम आहे
लकी अली यांची मैत्रीण आणि अभिनेत्री नफीसा अली यांनी एक पोस्ट शेअर करत सांगितले, ‘लकी अगदी ठीक आहे आणि आज दुपारीच आमचे बोलणे झाले आहे. तो त्याच्या कुटुंबीयांसोबत फार्महाऊसवर वेळ घालवत आहे. त्याला कोरोना झालेला नाही आणि त्याची प्रकृती ठिक आहे’ असे म्हटले आहे. लकी अली यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहायला सुरुवात केली होती.

आपल्या म्युझिक कॉन्सर्टचे प्लानिंग करत आहे लकी अली
नफीसा अली यांनी एका न्यूज वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, ‘मी दिवसातून 2 ते 3 वेळा लकीशी बोलले. तो ठीक आहे. त्याला कोरोना झालेला नाही. तो त्याच्या म्युझिक कॉन्सर्टच्या प्लानिंगमध्ये व्यग्र आहे. आम्ही व्हर्चुअल कॉन्सर्टबद्दल देखील बोललो होतो. तो बंगळुरुमध्ये फार्महाऊसवर आहे. त्याच्यासोबत त्याचे कुटुंबीय देखील आहेत. तो आणि त्याचे कुटुंबीय अगदी बरे आहेत,’ असे नफीसा म्हणाल्या.

लकी अली दीर्घ काळापासून प्रकाशझोतात नाहीत. मात्र आजही त्यांची गाणी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांच्या कॉन्सर्टचेदेखील अनेक व्हिडिओज नेहमी समोर येत असतात. 1996 मध्ये आलेले त्यांचे गाणे ओ सनम प्रचंड लोकप्रिय झाले होते. आता चाहते त्यांच्या पुढील म्युझिक अल्बमची प्रतिक्षा करत आहेत. लकी अली हे बॉलिवूडचे प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेते महमूद यांचा मुलगा आहे.

बातम्या आणखी आहेत...