आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्रीचे पुनरागमन:स्टेज -3 च्या कर्करोगाशी लढाई जिंकल्यानंतर नफीसा अली करण जोहरच्या चित्रपटातून करत आहेत कमबॅक, म्हणाल्या - सिनेमा हेच माझे पॅशन आहे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यावर्षी ऑगस्टच्या अखेरीस चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री नफीसा अली त्या सेलिब्रिटींपैकी एक आहे ज्यांनी कर्करोगाशी लढाई जिंकून आदर्श निर्माण केला आहे. 2018 मध्ये नफीसा यांना स्टेज 3 कर्करोगाचे निदान झाले होते, त्यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले होते. या दरम्यान, त्यांना अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर देखील आल्या, पण प्रकृतीमुळे त्यांनी सर्व चित्रपट नाकारले. आता तीन वर्षांनंतर त्या पुन्हा एकदा करण जोहरच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पुनरागमन करण्यास सज्ज झाल्या आहेत.

आपल्या पुनरागमनाबद्दल बोलताना नफीसा अली यांनी सांगितले की, त्यांची प्रतिकारशक्ती खूपच कमी झाली होती, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाने त्यांना मुंबईला जाण्यास नकार दिला. यामुळे त्यांना अनेक ऑफर सोडाव्या लागल्या. त्या म्हणाली, 'मी अनेक चित्रपट नाकारले आहेत, पण आता व्हॅक्सिनेटेड असल्यामुळे मला बाहेर पडायचे आहे. मला आयुष्य, लोक, आपुलकी, सर्जनशीलतेत असणे आवडते. सिनेमा हेच माझे पॅशन आहे.'

आजारातून बाहेर पडल्यावर अभिनेत्री म्हणाल्या, 'मला निरोगी आणि बरे वाटते. डॉक्टरांनी मला बरे केले आहे. परंतु ते देखील पाच वर्षांपूर्वी 100% क्लीन चिट देऊ शकत नव्हते. मी आशेने जीवन जगते, मला विश्वास आहे की मी उंच भरारी घेईल.'

नफीसा यांचा कमबॅक चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' हा देखील करण जोहरचा डायरेक्टोरिअल कमबॅक चित्रपट आहे, ज्यात ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हेदेखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यापूर्वी नफीसा आणि धर्मेंद्र यांनी लाइफ इन मेट्रोमध्ये एकत्र काम केले होते. नफीसा आणि धर्मेंद्र यांच्याशिवाय रणवीर सिंग, आलिया भट्ट, शबाना आझमी आणि जया बच्चन यांचा चित्रपटात भूमिका चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये समावेश आहे. आहेत. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होईल. यावर्षी ऑगस्टच्या अखेरीस त्याचे शूटिंग सुरू होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...