आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागा चैतन्य पुन्हा प्रेमात पडला?:शोभिता धुलिपालाबद्दल विचारल्यावर नागा हसला, म्हणाला - चांगला प्रश्न

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चांगला प्रश्न आहे - नागा

नागा चैतन्य सध्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे. तो आमिर खान स्टारर 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नागा सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच, एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये नागाला त्याची रुमर्ड गर्लफ्रेंड शोभिता धुलिपालाबद्दल प्रश्न विचारण्यात आला, ज्यावर तो हसला.

चांगला प्रश्न आहे - नागा
झाले असे की, जेव्हा नागाला एका मुलाखतीत शोभिताबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो हसला आणि चक्क लाजला. मात्र, लगेच सावरत तो म्हणाला – प्रश्न इतका चांगला आहे की मला हसू आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नागाने शोभिताला डेट करत असल्याचा वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण दोन्ही बाजूंकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

शोभिताने तिचा वाढदिवस हैदराबादमध्ये साजरा केला होता
काही दिवसांपूर्वी आलेल्या वृत्तानुसार, नागा चैतन्यने अलीकडेच हैदराबादमधील जुबली हिल्स येथे एक नवीन मालमत्ता खरेदी केली आहे. मात्र, सध्या तेथे काम सुरु आहे. या नवीन घरात चैतन्य आणि शोभिता एकत्र दिसले होते. चैतन्यने शोभिताला त्याच्या नवीन घराची झलक दाखवली होती. काही तास एकत्र घालवल्यानंतर दोघेही तेथून एकत्र बाहेर पडले होते.

याशिवाय शोभिता तिच्या 'मेजर' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ज्या हॉटेलमध्ये थांबली होती त्याच हॉटेलमध्ये चैतन्यला अनेकवेळा बघितले गेले होते. इतकेच नाही तर शोभिताने तिचा वाढदिवसही हैदराबादमध्येच साजरा केला. यानंतरही नागा आणि शोभिता अनेकदा एकत्र दिसले. तेव्हापासून दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

लग्नाच्या चौथ्या वाढदिवसापूर्वी तुटले नाते
सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांचा विवाह 6 ऑक्टोबर 2017 रोजी गोव्यात हिंदू रितीरिवाजांनुसार आणि नंतर 7 ऑक्टोबर रोजी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार झाला होता. लग्नानंतर सामंथाने तिच्या नावापुढे अक्किनेनी हे नाव लावले होते, मात्र विभक्त होण्याच्या वृत्तांदरम्यान, सामंथाने अक्किनेनी हे आडनाव तिच्या ट्विटर हँडलवरून काढून टाकले आणि नाव बदलून सामंथा रुथ प्रभू असे केले होते. 6 ऑक्टोबरला दोघांच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण होणार होती मात्र त्यापूर्वीच ते वेगळे झाले होते.

समुपदेशन करूनही निर्णय बदलला नाही
नागा चैतन्य आणि सामंथा घटस्फोट घेण्यापूर्वी या दोघांबद्दल बरेच काही बोलले आणि लिहिले गेले. मात्र, दोघांनीही याबाबत मौन बाळगले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सामंथा आणि नागा चैतन्य यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोघांचे फॅमिली कोर्टात समुपदेशन झाले होते. पण, समुपदेशन करूनही सामंथा आणि चैतन्यने आपला निर्णय बदलला नाही.

बातम्या आणखी आहेत...