आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिक्रिया:सामंथासोबत घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच व्यक्त झाला नागा चैतन्य, म्हणाला- विभक्त होण्याचा निर्णय आम्हा दोघांसाठी चांगला होता

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लग्नाच्या चौथ्या वाढदिवसापूर्वी तुटले लग्न

साउथ सुपरस्टार नागा चैतन्यने सामंथा रुथसोबत घटस्फोट घेतल्यानंतर पहिल्यांदाच मीडियाशी संवाद साधला आहे. सध्या नागा चैतन्य त्याच्या आगामी 'बंगाराजू' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यावेळी चैतन्यने सांगितले की घटस्फोट घेणे हा निर्णय आम्हा दोघांसाठी योग्य होता. सामंथा आणि चैतन्य यांनी लग्नाच्या 4 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

वेगळे होणे हा सर्वोत्तम निर्णय होता
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सध्या अनेक ठिकाणी नागा चैतन्य मुलाखती देत आहेत. एका मुलाखतीमध्ये नागा चैतन्यला त्याच्या आणि सामंथाच्या घटस्फोटाबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्याने उत्तर दिले, 'जर तुम्ही स्वत:चा विचार करून वेगळे होण्याचा निर्णय घेत असाल तर असे करणे योग्य आहे. ती खुश आहे तर मी खुश आहे. त्यामुळे घटस्फोट घेणे हा निर्णय योग्य होता.'

लग्नाच्या चौथ्या वाढदिवसापूर्वी तुटले लग्न
सामंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य यांनी गोव्यात 6 ऑक्टोबर 2017 रोजी हिंदू रितीरिवाजांनुसार आणि नंतर 7 ऑक्टोबर रोजी ख्रिश्चन पद्धतीने केले होते. लग्नानंतर सामंथाने तिच्या नावापुढे अक्किनेनी हे नाव लावले होते, मात्र विभक्त होत असल्याच्या चर्चांदरम्यान सामंथाने अक्किनेनी हे नाव तिच्या ट्विटर हँडलवरून काढून टाकले होते आणि त्याऐवजी सामंथा रुथ प्रभू असे केले. 6 ऑक्टोबर रोजी दोघांच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण होणार होती, मात्र त्यापूर्वीच ते वेगळे झाले.

सामंथाने पोस्ट शेअर करून दिली होती माहिती
सामंथाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून तिच्या घटस्फोटाबद्दल चाहत्यांना सांगितले होते. पोस्टमध्ये सामंथाने लिहिले होते, 'आमच्या सर्व हितचिंतकांसाठी.. खूप विचार केल्यानंतर, चैतन्य आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही पती-पत्नीसारखे आमचे मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्ही दहा वर्षांहून अधिक काळ मित्र आहोत जे आमच्या नात्याचा आधार होता. आमच्यात मैत्री कायम राहील. आम्ही आमच्या चाहत्यांना, हितचिंतकांना आणि माध्यमांना विनंती करतो की तुम्ही सर्वांनी आमच्या या कठीण काळात आम्हाला साथ द्या आणि आमच्या दोघांनाही पुढे जाण्यासाठी प्रायव्हसी द्या. तुमच्या सर्वांच्या समर्थनाबद्दल खूप आभार.'

सामंथाचे वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सामंथा अलीकडेच अभिनेता अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा द राइज' या चित्रपटातील एका डान्स नंबरमध्ये दिसली होती. यानंतर ती फिलिप जॉन दिग्दर्शित 'द अरेंजमेंट ऑफ लव्ह' या चित्रपटातून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

नागा चैतन्यचे वर्कफ्रंट
नागा चैतन्य 'बंगाराजू' या चित्रपटात त्याचे वडील-अभिनेते नागार्जुन अक्किनेनी, रम्या कृष्णन आणि क्रिती शेट्टीसोबत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कल्याण कृष्ण कुरासला यांनी केले आहे. याशिवाय तो हिंदीत 'लाल सिंग चड्ढा'मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आमिर खान, करीना कपूर आणि मोना सिंग देखील आहेत.