आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

800 कोटींचे मालक आहेत नागार्जुन:'ब्रह्मास्त्र'साठी अमिताभपेक्षा जास्त घेतली फी, एका फॅनने बनवले 1 कोटींचे मंदिर

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साऊथचे सुपरस्टार नागार्जुन यांचा आज 63 वा वाढदिवस आहे. 29 ऑगस्ट 1959 रोजी जन्मलेल्या नागार्जुन यांनी हिंदी आणि दक्षिणेतील जवळपास 100 चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1986 मध्ये प्रदर्शित झालेल्या विक्रम या दाक्षिणात्य चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तर 1990 मध्ये 'शिवा' या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमधील प्रवासाला सुरुवात केली. त्यांना नऊ राज्य नंदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 2012-13 च्या फोर्ब्सच्या यादीत भारतातील टॉप 100 लोकांमध्ये नागार्जुन 56व्या आणि 61व्या स्थानावर होते.

'ब्रह्मास्त्र'साठी अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त मानधन घेतले
9 सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात नागार्जुन झळकणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत रणबीर कपूर, आलिया भट्ट, मौनी रॉय आणि अमिताभ बच्चन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटासाठी सुमारे 10 कोटी रुपये घेतले आहेत. त्याचवेळी नागार्जुन यांनी या चित्रपटासाठी जवळपास 11 कोटी रुपये घेतले आहेत.

चाहत्याने बांधले मंदिर

नागार्जुन यांची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. 1997 मध्ये आलेल्या 'अन्नमय्या' या चित्रपटातून इम्प्रेस झालेल्या नागार्जुन यांच्या एका डाय-हार्ट फॅनने एक भव्य अन्नमाचार्य मंदिर बांधले होते.

मंदिरासाठी चाहत्यांनी जमवले होते 1 कोटी 30 लाख रुपये
रिपोर्ट्सनुसार, हे मंदिर आंध्र प्रदेशातील गुंटूरमध्ये राहणारे अक्किनेनी नागार्जुन यांचे चाहते सुधाकर स्वामी यांनी बांधले होते. 'अन्नमय्या' चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी 1997 मध्ये या मंदिराची पायाभरणी केली. 22 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर हे मंदिर तयार झाले. या मंदिराच्या उभारणीसाठी सुधाकर स्वामींच्या मित्रांनीही मदत केली. नागार्जुन यांच्या चाहत्याने मंदिरासाठी 1 कोटी 30 लाख रुपये जमा केले होते. श्री अन्नमय्या स्वामी मंदिरम असे या मंदिराचे नाव आहे.

800 कोटींचे मालक आहेत नागार्जुन
नागार्जुन 800 कोटींच्या मालमत्तेचे मालक आहेत. अन्नपूर्णा स्टुडिओ प्रोडक्शन कंपनीचेही ते मालक असून हा स्टुडिओ 7 एकरात पसरलेला आहे. याशिवाय ते अन्नपूर्णा इंटरनॅशनल स्कूल ऑफ फिल्म अँड मीडिया, हैदराबादचे अध्यक्ष आहेत. यासोबतच हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये त्यांचा सुमारे 40 कोटींचा बंगला आहे. नागार्जुन दोन रेस्तराँचे मालक आहेत, हैदराबादमध्ये त्यांचे एन-ग्रिल नावाचा रेस्तराँ आहे. एन एशियन नावाचे आणखी एक चायनीज रेस्तराँदेखील आहे.

दोन लग्नानंतर तब्बूसोबत होते अफेअर
नागार्जुन यांनी दोनदा लग्न केले. त्यांचे पहिले लग्न 1984 मध्ये लक्ष्मी दग्गुबतीशी केले. अवघ्या 6 वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला. त्यांना नागा चैतन्य नावाचा मुलगा आहे. यानंतर त्यांनी 1992 मध्ये अभिनेत्री अमलाशी लग्न केले. या लग्नातून त्यांना अखिल अक्किनेनी नावाचा मुलगाही आहे. नागार्जुनचे दोन्ही मुलं साऊथ इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. लग्न झाल्यानंतरही नागार्जुनचे बॉलिवूड अभिनेत्री तब्बूसोबत अफेअर होते. त्यांच्या अफेअरच्या अनेक चर्चा होत्या, पण नागार्जुन यांना आपल्या दुस-या पत्नीला घटस्फोट द्यायचा नव्हता, त्यामुळे दोघेही वेगळे झाले.

बातम्या आणखी आहेत...