आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नम्रताने सांगितले अभिनय क्षेत्राला अलविदा करण्यामागचे कारण:म्हणाली - महेशला काम न करणारी पत्नी पाहिजे होती

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूची पत्नी आणि माजी मिस इंडिया नम्रता शिरोडकर हिने अलीकडेच एका मुलाखतीत अभिनय क्षेत्र सोडण्यामागचे कारण सांगितले आहे. महेश बाबूला काम न करणारी पत्नी पाहिजे होती, असा खुलासा नम्रताने केला आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्राला फुटस्टॉप लावावा लागला, असे नम्रताने सांगितले.

जर मी एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असते तरी नोकरी सोडावी लागली असती - नम्रता एका तेलुगू युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये नम्रताने तिच्या करिअरबाबत तसेच वैयक्तिक आयुष्याबाबत सांगितले. ती म्हणाली, 'महेशचा विचार स्पष्ट होता. त्याला काम न करणारी म्हणजेच नॉन वर्किंग पत्नी पाहिजे होती. जरी मी एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असले असते, तरी देखील महेशने मला काम सोडायला सांगितले असते,' असे नम्रता म्हणाली.

माझ्यामुळे महेश बंगला सोडून अपार्टमेंटमध्ये राहिला होता - नम्रता
पुढे ती म्हणाली, 'आम्ही दोघेही खूप क्लिअर होतो. आम्ही लग्न झाल्यानंतर एका अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झालो. मी मुंबईला राहात होते मला माहित नव्हते की, मी या मोठ्या बंगल्यांमध्ये राहू शकते की नाही. मला भीती वाटायची म्हणून तो माझ्यासोबत एका अपार्टमेंटमध्ये गेला. माझी अट होती की, जर मी हैद्राबादला येणार तर मी अपार्टमेंटमध्ये राहणार. त्याचप्रमाणे, मला महेश बाबूने मला सांगितले, काम करायचे नाही. त्यामुळेच मी माझ्या सर्व चित्रपटांचे शूटिंग पूर्ण करण्यासाठी थोडा वेळ घेतला.'

लग्नापूर्वी पूर्ण केले चित्रपटांचे चित्रीकरण - नम्रता
नम्रता म्हणाली- 'आम्ही लग्नापूर्वी खूप वेळ घेतला होता, जेणेकरून मी माझ्या चित्रपटांचे शूटिंग पूर्ण करू शकेन. जेणेकरून आमचे लग्न झाल्यावर मला वेळ मिळावा. आधी मी माझ्या उरलेल्या सर्व चित्रपटांचे शूटिंग पूर्ण केले आणि त्यानंतर लग्न केले. आमच्या गोष्टींबद्दल आमच्यामध्ये नेहमीच खूप स्पष्टता होती,' असे नम्रताने सांगितले.

महेशसोबत लग्न केल्यानंतर माझे जग बदलले आहे - नम्रता
नम्रता सांगते की, महेशसोबत लग्न करणे हा तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण होता. ती म्हणाली- 'जेव्हा महेश आणि मी लग्न करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी माझे संपूर्ण जग बदलले. लग्न करण्याचा अनुभव माझ्यासाठी खूप खास आहे.'

2005 मध्ये झाले दोघांचे लग्न
नम्रता 17 वर्षांपूर्वी मोठ्या पडद्यावर शेवटची दिसली होती. ती शेवटचा 2004 मध्ये आलेल्या 'इन्साफ : द जस्टिस' आणि 'ब्राइड अँड प्रिज्युडिस' या चित्रपटांत दिसली होती. यानंतर 2005 मध्ये तिने महेश बाबूसोबत लग्न केले आणि चित्रपटात काम करणे बंद केले. महेश आणि नम्रता यांना 2 मुले आहेत, त्यांच्या मुलाचे नाव गौतम घट्टामनेनी आणि मुलीचे नाव सितारा घट्टामनेनी आहे. नम्रता अनेकदा तिच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते.

बातम्या आणखी आहेत...