आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चूक:आजोबा रणधीर कपूर यांनी चुकून शेअर केला करीनाच्या दुस-या बाळाचा फोटो, चूक लक्षात येताच केला डिलीट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हुबेहुब तैमूरसारखा दिसतो त्याचा धाकटा भाऊ

बॉलिवूड स्टार करीना कपूर खान आणि सैफ अली खान दुस-यांदा आईबाबा झाले आहेत. याचवर्षी 21 फेब्रुवारी रोजी करीनाने आपल्या दुस-या मुलाला जन्म दिला. मात्र अद्याप दोघांनीही आपल्या दुस-या बाळाचे नाव जाहीर केलेले नाही. दरम्यान जागतिक महिला दिनाच्या दिवशी करीनाने आपल्या बाळासोबतचा एक फोटो शेअर केला होता, परंतु त्यात तिने बाळाचा चेहरा दाखवला नव्हता. पण सोमवारी (5 एप्रिल) करीनाचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करुन काही वेळाने तो डिलीट केला. त्यांनी शेअर केलेला फोटो करीनाच्या दुस-या मुलाचा असल्याचे म्हटले जात आहे.

रणधीर यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता कोलाज

रणधीर कपूर यांनी चुकून त्यांच्या नातवाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोत करीना-सैफच्या मुलाचे दोन फोटो कोलाज करुन रणधीर कपूर यांनी शेअर केले होते. चुक लक्षात येताच त्यांनी तो फोटो डिलीट केला असला तरीदेखील फोटो काही यूजर्सनी पाहिला होता. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

करीनाचा छोटा मुलगा तैमूरसारखाच दिसतो - रणधीर कपूर
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत रणधीर यांनी सांगितले होते की, करीनाचा धाकटा मुलगा त्याचा भाऊ तैमूरसारखाच दिसतो. रणधीर यांना विचारण्यात आले होते की, नवजात बालक करीनासारखा दिसतो की सैफसारखा? यावर उत्तर देताना रणधीर म्हणाले होते की, 'मला तर सगळी मुलं सारखीच वाटतात. पण तिथे प्रत्येकजण म्हणत होते की तो (करीनाचा लहान मुलगा) आपल्या मोठ्या भावासारखा तैमूरसारखा दिसत आहे.'

बातम्या आणखी आहेत...