आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत मृत्यू प्रकरणाला नवीन वळण:भाजप खासदार नारायण राणेंचा खळबळजनक दावा, म्हणाले - सुशांतला ठार मारले गेले, महाराष्ट्रातील एक मंत्री घटनास्थळी हजर होता

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - नारायण राणे
  • नारायण राणे यांचा दावा आहे की, त्यांच्याकडे या मंत्र्यांविरूद्ध पुरावे असून ते सीबीआयला देतील.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला चार महिन्यांहून अधिकचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. उलट या प्रकरणी दररोज नवनवीन दावे पुढे येत आहेत. आता भाजपचे खासदार नारायण राणे यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.

नारायण राणे यांच्या म्हणण्यानुसार,"सुशांतने आत्महत्या केली नव्हती तर त्याची हत्या करण्यात आली. त्यावेळी सुशांतच्या घरी एक मंत्री देखील उपस्थित होता. सुशांत प्रकरण जर उघड झाले तर महाराष्ट्र मंत्रिमंडळातील एक मंत्री तुरूंगात जाऊ शकतो", असे वक्तव्य त्यांनी केले आहे. राणे म्हणाले की, त्यांच्याकडे या मंत्र्याविरोधात पुरावे असून ते सीबीआयकडे सोपवतील.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राणे म्हणाले, ''घटनेच्या रात्री काही लोक सुशांतच्या घरी गेले होते, त्यांनी सुशांतला दिशा सालियानच्या खूनासंदर्भात विचारणा केली. त्यानंतर त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले आणि त्या भांडणातच सुशांतला ठार केले गेले.''

  • राणे यांच्या मुलानेही असाच आरोप लावला होता

नारायण राणे यांच्या आधी त्यांचा मुलगा आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर निशाणा साधला होता. नितेश म्हणाले होते की, "हे लोक घाबरलेले आहेत, सुशांत-दिशा यांना नक्की न्याय मिळेल. माझ्या आणि आपल्यानुसार न्याय होणार नाही. सत्य बाहेर येईल, सत्य कुणालाही लपवता येणार नाही. जोपर्यंत ते मुख्यमंत्री आहेत तोपर्यंतच ते यावर पडदा पाडू शकतात. सीबीआयला जे काही करायचे आहे ते योग्यपद्धतीने करत आहेत. आम्हाला अमित शहाजींवर विश्वास ठेवायला हवा. आता जरी काही समोर येत नसले तरी तपास योग्य प्रकारे चालू आहे, म्हणूनच आम्ही शांत आहोत'', असे नितेश राणे यांनी म्हटले होते.

  • 14 जून रोजी सुशांतचा मृतदेह आढळला होता

यावर्षी 14 जून रोजी सुशांत त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. त्याचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला होता. यानंतर मुंबई पोलिस, बिहार पोलिस, एनसीबी, सीबीआय आणि ईडी यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. या प्रकरणात सीबीआयने बर्‍याच लोकांची चौकशी केली आहे. नारायण राणे यांच्या या दाव्यानंतर सीबीआय त्यांना चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.