आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ड्रग्ज प्रकरणात शनिवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची चौकशी केली. यावेळी या अभिनेत्रींचे मोबाइल फोनही जप्त करण्यात आले. परंतु एनसीबी कागदपत्रांवर सारा आणि श्रद्धा यांची सही घेण्यास विसरले होते. नंतर एजन्सीने दोन्ही अभिनेत्रींच्या घरी जाऊन त्यांची स्वाक्षरी घेतली. मात्र, यावेळी सारा घरी नव्हती. त्यामुळे एनसीबीने तिच्या घरातील एका सदस्याची सही घेतली.
वृत्तानुसार, दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंग यांनी एकसारखीच विधाने केली आहेत, असा दावा तपास यंत्रणेने केला आहे. त्यामुळे पुन्हा चारही अभिनेत्रींना समन्स पाठविण्यात येणार असून त्यांना चौकशीसाठी बोलावले जाईल.
एनसीबी दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर व रकुल प्रीत सिंग यांच्या बँक खात्यांतून झालेल्या व्यवहारांची तपासणी करेल. माध्यमांतील वृत्तांनुसार, या अभिनेत्रींनी ड्रग्जच्या खरेदी-विक्रीसाठी काही व्यवहार केले आहेत की नाहीत हे जाणून घेण्याचा प्रयत्न अधिकारी करत आहेत. या अभिनेत्रींनी गेल्या तीन वर्षांत क्रेडिट कार्डने केलेल्या पेमेंट्सची तपासणी केली आहे.
शनिवारी एनसीबीकडून साडेपाच तासांच्या चौकशीत दीपिका पदुकोणने तिची मॅनेजर करिश्मा प्रकाशसोबत केलेल्या ड्रग्ज चॅटची कबुली दिली. मात्र, तिने स्वत: ड्रग्ज घेतले नसल्याचे म्हटले आहे.
त्याचप्रमाणे सारा आणि श्रद्धा यांची जवळपास 6 तास चौकशी झाली. यावेळी दोघींनीही सुशांतला सेटवर ड्रग्जचे सेवन करताना पाहिले असल्याचे एनसीबीला सांगितले. मात्र स्वतः कधीही ड्रग्ज घेतले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यापूर्वी शुक्रवारी रकुल प्रीत सिंगची चौकशी करण्यात आली होती. तिने रिया चक्रवर्तीसोबतच्या ड्रग्ज चॅटची कबुली दिली. रियाने तिच्या घरी ड्रग्ज ठेवले होते, असे रकुलने सांगितले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, एनसीबीने आतापर्यंत जेवढ्या सेलिब्रिटींची चौकशी केली, त्यापैकी कुणालाही क्लीन चीट देण्यात आलेली नाही. याव्यतिरिक्त, 20 हाय-प्रोफाइल ड्रग पेडलर्स तपास एजन्सीच्या रडारवर आहेत. या प्रकरणात बॉलिवूडचे अनेक मोठे निर्माते आणि सात मोठ्या अभिनेत्यांच्या चौकशीला हिरवी झेंडी मिळाली आहे, असा दावाही सूत्रांनी केला. अभिनेत्री व ड्रग्ज पेडलर्सच्या चौकशीत ज्यांची नावे समोर आली त्यांच्या चौकशीची परवानगी एनसीबीचे प्रमुख राकेश अस्थानांनी अधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.