आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन:एनसीबीने अरबाज खान, वरुण शर्माचा स्टायलिस्ट सूरज गोदांबेला केली अटक, 11 ग्रॅम कोकेन जप्त

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सूत्रांच्या माहितीनुसार, आता तपास यंत्रणा अरबाज खान आणि वरुन शर्मा यांचीही चौकशी करू शकते.

बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) गुरुवारी मेकअप आर्टिस्ट आणि हेअर स्टायलिस्ट सूरज गोदांबेला अटक केली आहे. तपास यंत्रणेशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज गोदांबेकडून 11 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. गोदांबेने बर्‍याच मोठ्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम केले असून तो अरबाज खान प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडमधील मेकअप विभागाचा प्रमुख आहे. याशिवाय तो वरुण शर्माचा हेअर स्टायलिस्टही आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आता तपास यंत्रणा अरबाज खान आणि वरुन शर्मा यांचीही चौकशी करू शकते.

सूरजने रिक्षाचालकाकडून घेतले होते कोकेन
गुरुवारी एनसीबीने विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात छापा टाकून ओशिवरा येथील मीरा टॉवरजवळ दोन जणांना अटक केली. त्यांच्याकडे 56 हजार रुपये आणि कोकेनचे 16 (पॅकेट्ससह वजन 17.6 ग्रॅम ) जप्त करण्यात आले आहेत. पॅकेट काढून टाकल्यानंतर कोकेनचे एकुण वजन 11 ग्रॅम होते.

आरोपींकडून जप्त करण्यात आलेले पैसे आणि ड्रग्ज
आरोपींकडून जप्त करण्यात आलेले पैसे आणि ड्रग्ज

या आरोपींपैकी एक म्हणजे सूरज गोदांबे (ज्याने ड्रग्ज घेतले) आहे. तर ड्रग सप्लायरचे नाव लालचंद्र यादव असून तो एक रिक्षाचालक आहे. लालचंद्रने नायजेरियन सिंडिकेटच्या वतीने ड्रग्ज सप्लाय करत होता. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचे प्रमाण मध्यम आहे. त्यामुळे सीएमएम कोर्टाने दोघांना 16 डिसेंबरपर्यंत एनसीबी कस्टडीमध्ये पाठवले आहे.

बुधवारी एनसीबीला मोठे यश आले

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोला (एनसीबी) चौकशीत बुधवारी मोठे यश मिळाले आहे. एजन्सीने दोन ड्रग पेडलर्सना अटक केली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकून तब्बल अडीच कोटींचा चरसही जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी जप्ती असल्याचा दावा एनसीबीच्या एका अधिका-याने केला आहे. जिनेंद्र जैन उर्फ ​​रीगल महाकाल आणि मोहम्मद आझम जुम्मन शेख असे अटक केलेल्या पेडलर्सची नावे आहेत.

भास्करला एका अधिका-याने सांगितले की, दोन्ही पेडलर्स 2 दिवसांच्या रिमांडवर आहेत. रीगल महाकालने सुशांत आणि रियाशी संबंधित अनेक रहस्येही उघड केली आहेत. या नंतर रिया आणि या प्रकरणाशी संबंधित लोकांच्या अडचणी वाढू शकतात. अधिका-याने सांगितले की, रिया-शोविकला पुन्हा ताब्यात घेतले जाईल की नाही, याविषयी अद्याप काही सांगता येणार नाही, परंतु आम्हाला या प्रकरणात आता जे इनपुट मिळाले आहेत, ते मोठा टर्निंग पॉईंट आहे आणि यावेळी जप्त करण्यात आलेला ड्रग्जचा साठाही मोठा आहे.

'मुंबईतील ड्रग्ज सप्लायची संपूर्ण साखळी संपवली'
अधिकारी म्हणाले- आजम जुम्मन शेख ड्रग्ज सप्लायर आहे. रीगल महाकालला तो ड्रग्ज पुरवत असे. रीगल हे ड्रग्ज अनुज केसवानीला पुरवायचा. अनुज हा कैजानचा सप्लाय करायचा. कैजान हेच ड्रग्ज सुशांत आणि रियाचा नोकर दीपेशला देत असे. आम्ही मुंबईमधून ड्रग्ज सप्लायरची संपूर्ण साखळी संपवली. जप्त केलेल्या चरसला मलाना क्रीम म्हटले जाते. हे जगातील सर्वात जास्त मागणी असलेल्या चरस आहे. हे केवळ हिमाचलच्या मलाना भागात आढळते. आंतरराष्ट्रीय बाजारात मलाना क्रीमची किंमत प्रति किलो 40-50 लाख रुपये आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser