आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण:घरातून ड्रग्ज मिळाल्यानंतर निर्माते फिरोज नाडियाडवालाच्या पत्नीला अटक, वैद्यकीय तपासणी सुरू; NCBने फिरोज यांनाही पाठवले समन

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • याप्रकरणी एनसीबीने नाडियाडवाला यांना समन्स पाठवले आहे.

बॉलिवूड निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्या घरातून अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) अंमली पदार्थ जप्त केले असून, या प्रकरणी त्यांची पत्नी शबाना सईदची चौकशी करून तिला अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. फिरोज यांची पत्नी शबाना सईद यांना आज वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. याप्रकरणी एनसीबीने नाडियाडवाला यांना समन्स पाठवले आहे.सोमवारी त्यांना चौकशीसाठी हजर व्हायचे आहे.

घरातून ड्रग्ज जप्त

त्यांच्याकडून 717 ग्रॅम गांजा, 74.1 ग्रॅम चरस आणि 95.1 ग्रॅम एमडी तसेच रोकड जप्त करण्यात आली. याची किंमत 3 लाख 66 हजार 610 रुपये आहे. एनसीबीने 3 मोबाईलसह ड्रग्ज जप्त केले.

कसे समोर आले नाव?
एनसीबीने छापा टाकला त्यावेळी नाडियाडवाला घरी नव्हते. एनसीबीने 7 व 8 नोव्हेंबरच्या रात्रीपासून अनेक ड्रग पॅडलर्सच्या घरावर धाडी टाकल्या असून आणखी 5 ड्रग पॅडलर्सला ताब्यात घेतले आहे. ड्रग्जप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या अनेक संशियांताच्या केलेल्या चौकशीतून नाडियाडवाला यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी एनसीबीने धाडी टाकल्या होत्या, असे सूत्रांनी सांगितले. फिरोज नाडियाडवाला यांनी हेराफेरी, आवारा पागल दिवाना, वेलकम, कारतूससारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

आतापर्यंत एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडमधील अनेक बड्या अभिनेत्रींची चौकशी केली आहे. यामध्ये दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत आणि श्रद्धा कपूर यांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश अभिनेत्रींनी आपण ड्रग्जचे सेवन केल्याचीही कबुली दिली होती. यानंतर एनसीबीकडून अभिनेत्रींना कोणाच्या माध्यमातून ड्रग्ज पुरवले जात होते, याचा शोध घेतला जात आहे.

काही दिवसांपूर्वीच दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिची एनसीबीकडून सहा तास कसून चौकशी करण्यात आली होती. करिश्मा प्रकाश दीपिका पादुकोणची मॅनेजर होती. ती क्वान कंपनीच्या वतीने दीपिकाचे काम सांभाळत होती. एनसीबीने अलीकडेच तिच्या घरावर छापा टाकून ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर ती पुन्हा एकदा एनसीबीच्या रडारवर आली.

बातम्या आणखी आहेत...