आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2020 मध्ये ड्रग्जची सर्वाधिक प्रकरणं:सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर NCB ने 3 महिन्यांत 30 गुन्हे नोंदवले, 92 लोकांना केली अटक

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला एनसीबीने मुंबईतील दोन वेगवेगळ्या भागात छापे टाकून तीन ड्रग्ज पेडलर्सना अटक केली.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे मुंबई आणि गोव्याचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणेने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर गेल्या तीन महिन्यांत मुंबई-गोव्यात 30 गुन्हे दाखल केले आणि 92 लोकांना अटक केली.

2020 मध्ये सर्वाधिक प्रकरणं आणि अटक

समीर वानखेडे यांच्या म्हणण्यानुसार, 2020 मध्ये देशभरात अमंली पदार्थांशी संबंधित 46 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. आकडेवारी सांगताना ते म्हणाले, '2016 मध्ये एनसीबीने 23 गुन्हे दाखल केले होते आणि 29 ड्रग्ज पेडलर्सना अटक केली होती. 2018 मध्ये गुन्ह्यांच्या प्रकरणांची संख्या 25 तर अटक झालेल्यांची संख्या 55 होती. 2019 मध्ये एकुण केस 35 आणि 55 ड्रग्ज पेडलर्सना अटक झाली होती. तर 2020 मध्ये सर्वाधिक म्हणजे 46 केस फाइल झाल्या आणि 92 ड्रग्ज पेडलर्सना अटक करण्यात आली.'

ऑगस्टमध्ये बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आले

बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन ऑगस्ट 2020 मध्ये उघडकीस आले होते. खरं तर, 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूत मुंबईतील त्याच्या भाड्याच्या घरात मृतावस्थेत आढळला होता. सुमारे दीड महिन्यानंतर, त्याचे वडील के.के. सिंह यांनी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरुद्ध पाटण्यात एफआयआर दाखल केला. सिंह यांनी रियावर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि त्याच्या बँक खात्यातून 15 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रिया आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांसह 6 जणांविरोधात मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल करुन चौकशी सुरु केली होती. दरम्यान ऑगस्टच्या महिन्याच्या शेवटी एक ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आले आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) रियाविरूद्ध गुन्हा नोंदविला आणि तपास सुरू केला. 8 सप्टेंबर रोजी तिची चौकशी करुन एजन्सीने तिला अटक केली होती. 30 दिवस तुरूंगात राहिल्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने रियाला जामीन मंजूर केला होता.

या प्रकरणात अनेक दिग्गजांची नावे समोर आली

ड्रग्ज प्रकरणाचा तपास सुरु असताना रियाच नव्हे तर तिचा भाऊ शोविक चोक्रवर्ती, अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, अभिनेता अर्जुन रामपाल, कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांच्यासह मनोरंजन क्षेत्राशी संबंधित अनेक नावे यात समोर आली. एनसीबीनेही सर्वांची चौकशी केली. रिया, शोविक, भारती आणि हर्ष यांना चौकशी एजन्सीने अटक केली होती, नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली.

बातम्या आणखी आहेत...