आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगल:फॉरेन्सिक तपासणीसाठी डीएफएसला पाठवण्यात आले 15 मोबाइल फोन, चौकशीनंतर रिया, दीपिका पदुकोणसह अनेकांचे फोन करण्यात आले होते जप्त

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तपासणी यंत्रणा संबंधित फोनमधील कॉन्टॅक्ट लिस्ट, मेसेज, सोशल मीडियावरील चॅट आणि मीडिया फायली तपासू इच्छित आहेत.
  • या तपासातील अहवालाच्या आधारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो पुन्हा ड्रग्जच्या प्रकरणाची चौकशी सुरू ठेवण्याची शक्यता आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्ज अँगलची चौकशी करणार्‍या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) 15 मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी गांधीनगर (गुजरात) च्या फॉरेन्सिक सायन्सेस संचालनालय (डीएफएस) कडे पाठवले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार यातील बरेच फोन ड्रग पेडलर्स आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचे आहेत.

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार तपास यंत्रणेला संबंधित फोनमधील कॉन्टॅक्ट लिस्ट, मेसेज, सोशल मीडियावरील चॅट आणि मीडिया फायली तपासायच्या आहेत. या तपासातील अहवालाच्या आधारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ड्रग्ज प्रकरणाची चौकशी पुढे नेण्याची शक्यता आहे.

एनसीबीच्या ताब्यात या लोकांचे फोन आहेत
सविस्तर चौकशीसाठी अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंग यांचे मोबाइल फोन एनसीबीने ताब्यात घेतल्याची माहिती सप्टेंबरमध्ये समोर आली होती. याशिवाय दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश, डिझायनर सिमोन खंबाटा आणि सुशांतची टॅलेंट मॅनेजर जया साहा, रिया चक्रवर्ती यांचेही मोबाइल फोन एनसीबीने जप्त केले आहेत.

तपास पुन्हा वेग पकडू शकतो
या मोबाइल फोनमधील सविस्तर अहवाल समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो पुन्हा या प्रकरणातील तपासाला वेग देऊ शकेल. सुशांत प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांच्यासह एनसीबीने सुशांत प्रकरणात 20 हून अधिक जणांना अटक केली आहे. रिया सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहे, तर शोविक अद्याप तुरूंगात आहे.