आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Narcotics Control Bureau Summons Deepika Padukone, Shraddha Kapoor, Sara And Rakul Preet Singh In Drugs Related Case Linked To Sushant Death News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रग्स प्रकरणात 4 मोठ्या अभिनेत्रींना समन्स:एनसीबीने रकुलप्रीतला आज चौकशीसाठी बोलावले; उद्या दीपिकाचा नंबर, रियासारखा खटला सिद्ध झाल्यास दीपिकालाही होऊ शकते अटक

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एनसीबी ड्रग्ज खरेदी सिद्ध करू शकली तरच सोशल मीडियातील संवाद ठरू शकतो कठोर शिक्षेचा आधार

सुशांत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलची चौकशी करत असलेल्या एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर आता एकाच वेळी बॉलीवूडच्या ४ तारकांना चौकशीचे समन्स बजावल्याने खळबळ उडाली आहे. एनसीबीने अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान व रकुलप्रीत सिंहला वेगवेगळ्या दिवशी चौकशीसाठी बोलावले आहे. गुरुवारी रकुलप्रीत सिंहला बोलावण्यात आले आहे. श्रुती मोदी, सिमोन खंबाटालाही चौकशीसाठी पाचारण केले आहे. टॅलेंट मॅनेजर करिश्मा प्रकाश व दीपिकाच्या चॅटचे स्क्रीनशॉट मिळाल्यानंतर दीपिकाला चौकशीस बोलावले आहे. करिश्माने आपण आजारी असल्याचे म्हणत एनसीबीकडे २५ सप्टेंबरपर्यंतची मुदत मागितली आहे. दुसरीकडे, ती दीपिकासोबत गोव्यात असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. दीपिकाला अटक केली जाऊ शकते का, या प्रश्नावर एनसीबीचे उपसंचालक (ऑपरेशन) कमल मल्होत्रा यांनी काही बोलण्यास नकार दिला.

चौकशीसाठी बोलावले जाऊ शकतात अनेक दिग्गज :

सूत्रांनुसार, चौकशीसाठी एक प्रख्यात टीव्ही मालिका निर्माता, ३ फॅशन डिझायनर, एक प्रख्यात चित्रपट निर्माता-दिग्दर्शक, २ बडे अभिनेते व २ नृत्यदिग्दर्शक एनसीबीच्या निशाण्यावर आहेत.

रियावर लावलेली कलमे दीपिकावरही!

एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, रिया चक्रवर्ती आणि दीपिका पदुकोन या दोघींच्या प्रकरणात जर कुठूनही त्या एकच सिंडिकेटचा भाग आहे हे सिद्ध झाले तर समान कलमे लागू होऊ शकतात आणि शिक्षा होऊ शकते. रिया चक्रवर्तीचे प्रकरण या प्रकरणाशी जुळते कारण टॅलेंट मॅनेजर जया साह या सर्वांच्या संपर्कात आहे आणि जया साहने ड्रग्ज पुरवठा केल्याची कबुली दिली आहे. दीपिका पदुकोनही ड्रग्ज घेण्याची गोष्ट बोलत आहे आणि तिला पुरवठाही केला जात आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) कारवाईचा आधार काय आहे हे सांगत आहेत एनडीपीएस कायद्याचे जाणकार, सुप्रीम कोर्टाचे वकील सुमित वर्मा...

> सोशल मीडियात अमली पदार्थांच्या फक्त देवाणघेवाणीची गोष्ट शिक्षेसाठी आधार ठरू शकते ?

गुन्हा दाखल होऊ शकतो, एनसीबीला ते चॅटिंग पुरावा म्हणून कोर्टात सिद्ध करावे लागेल. आरोपींनी ड्रग्ज घेतले हे एनसीबीला सिद्ध करावे लागेल. पैशाचे व्यवहार दाखवावे लागतील.

> चॅटिंगमध्ये हॅश कोडच्या वापारामुळे केस होऊ शकेल?

गुन्हा तर दाखल होईल, पण चॅटिंग विनोद म्हणून करण्यात आले नव्हते हे एनसीबीला आरोपींच्या मोबाइलमार्फत सिद्ध करावे लागेल. जैन हवाला केसमध्येही डायरीतील कोडवर्डच्या आधारे गुन्हा दाखल झाला होता.

> अशा संवादाच्या आधारावर छापा टाकला जाऊ शकतो?

निश्चित. छापा टाकला जाऊ शकतो. तपास पुढे नेणे, संवादाची लिंक खरी असल्याचे सिद्ध करणे आणि पुरावे शोधण्याची गरज आहे.

> अमली पदार्थ जप्त झाले नाहीत तर फक्त देवाण-घेवाणीच्या संवादावर गुन्हा दाखल होऊ शकतो का ?

अशा स्थितीत अमली पदार्थ सेवनाचा गुन्हा दाखल करता येऊ शकतो. त्यात एक वर्षाची शिक्षा किंवा कमाल २० हजार रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. पण आरोपीने न्यायालयात नशामुक्तीची इच्छा व्यक्त केली तर त्याला शिक्षा होणार नाही. त्याला नशामुक्ती केंद्रात पाठवले जाईल.

> एखाद्या आरोपीच्या जबाबाच्या आधारावर कोणालाही चौकशीसाठी बोलावता येऊ शकते का?

तपास पुढे नेण्यासाठी तसे करता येऊ शकते.

> जप्तीशिवाय एखाद्याच्या जबाबावरून दुसऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करता येऊ शकतो का?

निश्चित केला जाऊ शकतो. जर एखादी व्यक्ती फॅसिलिटेट करत असेल आणि पुरावाही सादर करत असेल तर त्याच्या आधारेही एनसीबी इतरांना संबंधित प्रकरणात अटक करू शकते.

> एनसीबीला कोणत्या प्रकारचे विशेष अधिकार आहेत आणि अशा प्रकरणांत जामीन मिळणे किती कठीण असते?

एखाद्या सोसायटीत ड्रग्जचा व्यवसाय होत असेल तर तो रोखण्याचा अधिकार एनसीबीला आहे. फक्त ड्रग्ज खरेदी करणारी किंवा विकणारी व्यक्तीच नव्हे तर ती पुरवणारी व्यक्तीही गुन्हेगार असते. अशा प्रकरणांत एनसीबी आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवू शकते. अशा प्रकरणात आरोपीकडे ड्रग्ज किती प्रमाणात जप्त झाले आहे यावर त्याला जामीन मिळणे किंवा न मिळणे अवलंबून आहे. जर आरोपीवर फक्त ड्रग्जच्या सेवनाचा आरोप असेल तर त्याला त्वरित जामीन मिळतो आणि आरोपीला ड्रग्जच्या व्यावसायिक प्रमाणासह अटक झाली असेल किंवा तो ड्रग्जचे उत्पादन किंवा व्यवसाय करण्याच्या प्रकरणातील आरोपी असेल तर अशा आरोपींना जामीन मिळत नाही.

कोणत्या ड्रग्जच्या किती प्रमाणावर किती शिक्षेची तरतूद आहे?

> गांजा : १ किलोपेक्षा कमी जप्त झाल्यास प्रमाण कमी. १ किलो ते २० किलोदरम्यान मध्यम प्रमाण. दोन्ही जामीनपात्र गुन्हे. २० किलोपेक्षा जास्त व्यावसायिक प्रमाण आहे. तो अजामीनपात्र गुन्हा.

> चरस, कोकेन, मारिजुआना, हशीश : १०० ग्रॅमपर्यंत कमी प्रमाण. जामीन मिळतो. १०० ग्रॅम ते १ किलोपर्यंत प्रमाण असेल तर तथ्यांच्या आधारावर जामीन. १ किलोवर असेल तर जामीन नाही.

> हेरॉइन : ५ ग्रॅमपेक्षा कमी प्रमाण कमी मानले जाते, हा जामीनपात्र गुन्हा आहे. २५० ग्रॅमपेक्षा जास्त व्यावसायिक प्रमाण आहे. त्यात किमान १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

बातम्या आणखी आहेत...