आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानुकताच ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळा पार पडला. यंदाच्या सोहळ्यात दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याने बेस्ट ओरिजिनल साँग कॅटेगरीमध्ये पुरस्कार पटकावला आहे. तर 'द एलिफंट विस्परर्स' या डॉक्युमेंट्रीने सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म या कॅटेगिरीमधील ऑस्कर आपल्या नावी केला. दोन ऑस्कर भारताकडे आले आहेत. जगभरातून ऑस्कर विजेत्यांचे कौतुक केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट शेअर करुन 'आरआरआर' आणि 'द एलिफंट विस्परर्स' या टीम्सचं कौतुक केले आहे.
पहिल्या ट्वीटमध्ये नरेंद्र मोदी यांनी 'आरआरआर' चित्रपटाच्या टीमचे कौतुक केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले, "नाटू नाटूची लोकप्रियता जागतिक आहे. पुढील अनेक वर्षे स्मरणात राहिल, असे हे गाणे आहे. एम एम किरवानी, चंद्रबोस आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. भारताला आनंद होत आहे आणि अभिमान वाटत आहे," असे मोदी म्हणाले आहेत.
तर दुसऱ्या ट्वीटमध्ये नरेंद्र मोदीं यांनी 'द एलिफंट विस्परर्स' या डॉक्युमेंट्रीच्या टीमचे अभिनंदन केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले, "द एलिफंट विस्परर्सच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. त्यांनी सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे महत्त्व अधोरेखित केले."
एस.एस. राजामौली दिग्दर्शित 'आरआरआर' हा चित्रपट 24 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासोबतच आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. दुसरीकडे 'द एलिफंट विस्परर्स' हा नेटफ्लिक्सवरचा एक माहितीपट आहे. गुनीत मोगा यांनी 'द एलिफंट विस्परर्स' या माहितीपटाची निर्मिती केली तर कार्तिकी गोन्साल्विसने या माहितीपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.