आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालयातून घरी परतले नसीर:नसीरुद्दीन शाह यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, मुलगा विवानने शेअर केले फोटो

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या आठवड्यात रुग्णालयात करण्यात आले होते दाखल

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांचा मुलगा विवानने रत्ना पाठक शहासोबतची त्यांची काही छायाचित्रे इन्स्टाग्रामवर शेअर केली आहेत. नसीर यांना गेल्या महिन्यात न्युमोनिया झाला होता. फोटोमध्ये नसीर आणि रत्ना एकत्र दिसत आहेत. फोटोच्या कॅप्शनमध्ये विवानने लिहिले आहे - 'त्यांना आज सकाळी डिस्चार्ज मिळाला आहे, घरी परत आले.' सोबत त्याने हृदय आणि फोल्डिंग हँड्स इमोजी बनवून चाहत्यांचे आभार मानले आहेत.

गेल्या आठवड्यात रुग्णालयात करण्यात आले होते दाखल
70 वर्षीय नसीर यांना गेल्या मंगळवारी मुंबईच्या खार हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पत्नी रत्ना पाठक यांनी सांगितल्यानुसार, त्यांच्या फुप्फुसात एक पॅच आढळला होता. त्यांची प्रकृती स्थिर असून चिंतेचे कारण नाही. तसेच त्यांना कोरोना किंवा इतर कोणताही आजार नसल्याचे रत्ना पाठक यांनी सांगितले होते.

नसीर यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली
नसीरुद्दीन शाह हे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) चे माजी विद्यार्थी आहेत. त्यांना समांतर सिनेमातील योगदानासाठी ओळखले जाते. ज्यात निशांत, जाने भी दो यारो, इजाजत, मासूम आणि मिर्च सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी मोहरा, सरफरोश, इश्किया, द डर्टी पिक्चर आणि जिंदगी ना मिलेगी दोबारा सारख्या चित्रपटांसह कमर्शिअल चित्रपटांमध्ये स्वत:चे वेगळे खास निर्माण केले.

बातम्या आणखी आहेत...