आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाउनमध्ये नो आउटिंग:संध्याकाळी वॉकला बाहेर पडले नसीरुद्दीन शाह, मुंबई पोलिसांनी दिला घरातून बाहेर न पडण्याचा सल्ला

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नसीरुद्दीन यांनी पोलिसांचे म्हणणे ऐकले

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह आठवड्यातून दोन ते तीनदा ईव्हिनंग वॉकला जात असतात. असेच ते बुधवारी संध्याकाळी वॉकसाठी निघाले होते. पण त्यांना लगेचच घरी परतावे लागले. कोरोना लॉकडाउनमुळे मुंबई पोलिसांनी त्यांना घरातून बाहेर पडण्यासाठी मनाई केली आणि घरी परत जाण्यास सांगितले.

नसीरुद्दीन यांनी पोलिसांचे म्हणणे ऐकले
ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, पाली हिल स्थित परिसरात नसीरुद्दीन शाह ईव्हिनिंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. मात्र तेवढ्यातच एका पोलिसाने त्यांना अडवले आणि वॉकला न जाण्याविषयी सांगितले, सोबतच कोरोना लॉकडाउनच्या नियमांचे पालन करण्यासही सांगितले. पोलिसांनी हटकल्यानंतर कोणताही वाद न घालता नसीरुद्दीन शाह घरी परतले. मागच्या वर्षीही नसीरुद्दीन त्यांच्या पत्नी रत्ना पाठकसोबत लॉकडाउनच्या काळात वॉकला गेलेले पाहायला मिळाले होते. नसीरुद्दीन शाह मुंबईच्या वांद्रे भागात राहतात आणि ते नेहमीच कार्टर रोड परिसरात वॉकसाठी गेलेले असताना कॅमेऱ्यात कैद होतात.

पद्मभूषण आणि तीन राष्ट्रीय पुरस्कार विजेते
70 वर्षीय नसीरुद्दीन शाह यांना आतापर्यंत तीन राष्ट्रीय पुरस्कार, तीन फिल्मफेअर पुरस्कार, पद्मश्री आणि पद्मभूषण या सर्वश्रेष्ठ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 1979 मध्ये 'स्पर्श', 1984 मध्ये 'पार' आणि 2006 मध्ये 'इकबाल' या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. भारत सरकारने 1987 मध्ये पद्मश्री आणि 2003 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता.

100 हून अधिक चित्रपटांत अभिनय
नसीरुद्दीन शाह यांनी 1975 मध्ये निशांत या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू केला होता. आतापर्यंत त्यांनी 100 हून अधिक चित्रपटांत अभिनय केला आहे. सुरुवातीला 'निशांत', 'मंथन' आणि 'भूमिका' या चित्रपटांमध्ये काम करून त्यांनी समांतर सिनेमांमध्ये जम बसवला. त्यानंतर ते एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून ओळखले जाऊ लागले. या चित्रपटानंतर त्यांनी 'भवनी भवाई', 'मासूम', ‘अर्धसत्य’, ‘मंडी’सारख्या चित्रपटांमध्ये असा अभिनय केला ज्याची कुणीच कल्पनासुध्दा करू शकत नव्हते.

‘हम पांच’नंतर त्यांनी ‘कर्मा’मधून मुख्य भूमिकांच्या चित्रपटांकडे पाऊल उचलले. त्यानंतर नसिरुद्दीन शाह यांनी त्रिदेव’, ‘विश्वात्मा’, ‘गुलामी’ आणि ‘मोहरा’मध्ये मुख्य भूमिका साकारल्या. हिंदी सिनेमांसह त्यांनी 'भारत एक खोज' आणि 'मिर्जा गालिब' या मालिकांमध्ये दमदार भूमिका वठवल्या. अलीकडेच ते 'राम प्रसाद की तेरहवीं' (2020) या चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट लॉकडाउनच्या काळात रिलीज झाला होता. याशिवाय झी 5 च्या 'मी रक्शम' (2020) या चित्रपटातही ते दिसले होते. नसीर यांनी 'यूं होता तो क्या होता' (2006) हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.

बातम्या आणखी आहेत...