आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातामुळे गमावला जीव:राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता संचारी विजयचे निधन, दोन दिवसांपूर्वी बाइकवरुन पडल्याने डोक्याला झाली होती गंभीर दुखापत

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शनिवारी रात्री 11.45 वाजता संचारी विजय अपघातात जखमी झाले होते.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते संचारी विजय यांचे सोमवारी निधन झाले. ते 38 वर्षांचे होते. बंगळुरु येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी रात्री बाइकवरुन पडल्याने विजय यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी ब्रेन डेड झाल्याचे सांगितले, त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.

मृत्यूनंतरही करणार समाजसेवा
विजय यांचा भाऊ सिद्धेश यांनी सांगितले की, 'विजय यांच्या मेंदूचे कार्य बंद झाले होते. त्यामुळे आम्ही त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. समाजासाठी काहीतरी करण्याची संचारी विजयची
कळकळ होती. कोरोना काळातसुद्धा ते गरजुंसाठी 24 तास काम करत होते. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. मृत्यूनंतरही ते समाजसेवा करत राहतील.' या
कठीण काळात मदतीसाठी आलेल्या सर्वांचे सिद्धेश यांनी आभार मानले आहेत.

किच्चा सुदीप यांनी व्यक्त केला शोक
अभिनेते किच्चा सुदीप यांनी विजय यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 'संचारी विजय आता आपल्यात नाही, यावर विश्वास बसत नाहीये. या लॉकडाउनमध्ये आमची दोनदा भेट झाली होती. ते
आपल्या आगामी चित्रपटाविषयी खूप उत्सुक होते, तो चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. अतिशय दुःखद घटना,' अशा शब्दांत किच्चा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कसा झाला संचारी यांना अपघात
ही घटना शनिवारी रात्री 11.45 वाजताच्या सुमारास घडली होती. रिपोर्ट्सनुसार, विजय त्यांचा मित्र नवीनच्या बाईकवर पाठीमागे बसले होते. पावसामुळे रस्ते ओले झाले होते त्यामुळे त्यांची बाईक
घसरली आणि ते खाली पडले. यावेळी विजय यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर तातडीने त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

कर्नाटक चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते
विजय हे कर्नाटक चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी 2015 मध्ये आलेल्या 'नानु अवानल्ला अवालु' या चित्रपटातून आपली ओळख निर्माण केली होती. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना
राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय कर्नाटक स्टेट फिल्म अवॉर्डही त्यांना मिळाला होता.

बातम्या आणखी आहेत...