आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार वनराज भाटिया यांचे शुक्रवारी मुंबईत निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयोमानाने त्यांना अनेक शारीरिक व्याधींनी जखडले होते. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
31 मे 1927 रोजी जन्मलेल्या वनराज भाटिया यांनी लंडनच्या रॉयल अकॅडमी ऑफ म्युझिक येथून संगीताचे शिक्षण घेतले होते. 1959 मध्ये ते भारतात परतले आणि येथे काम सुरु केले. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी जाहिरातींसाठी जिंगल बनवणे सुरु केले होते. त्यानंतर 1972 मध्ये श्याम बेनेगल यांच्या 'अंकुर' या चित्रपटासाठी त्यांनी बॅकग्राऊंड म्युझिक दिले. यानंतर श्याम बेनेगल यांच्यासोबत त्यांनी भूमिका, सरदारी बेगम आणि हरी भरीसह 16 चित्रपटांसाठी एकत्र काम केले.
वनराज यांना भारतातील पाश्चात्य शास्त्रीय संगीताचे सर्वात मोठे संगीतकार असल्याचे म्हटले जाते. त्यांनी जवळजवळ 7 हजार जाहिरातींसाठी जिंगल बनवले होते. जाने भी दो यारो, पेस्टॉनजी, तरंग, पर्सी, द्रोह काल या चित्रपटांना संगीत देण्याशिवाय त्यांनी अजुबा, बेटा, दामिनी, घातक, परदेस, चमेली यांसारख्या चित्रपटांना बॅकग्राऊंड म्युझिक दिले. याशिवाय त्यांनी खानदान, वागले की दुनिया, नकाब, लाइफलाइन, भारत एक खोज आणि बनेगी अपनी बात यांसारख्या टीव्ही शोजसाठीदेखील संगीतकार म्हणून काम केले होते.
वनराज भाटिया यांना गोविंद निहलानी यांच्या 'तमस'साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तर 1989 मध्ये संगीत अकादमी अवॉर्ड आणि 2012 मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.