आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा माफीनामा:सोशल मीडिया हँडलवर शेअर केले मौनी रॉयचे ग्लॅमरस फोटो, चुक लक्षात येताच डिलीट केली पोस्ट, म्हणाले...

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री मौनी रॉय शनिवारी अचानक चर्चेत आली.

छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री मौनी रॉय शनिवारी अचानक चर्चेत आली. याचे कारण म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच राष्ट्रीय शेअर बाजारच्या अधिकृत ट्विटर हँडलवर चक्क मौनीचे फोटो शेअर केले गेले. सोबतच #sexydiva, #beautyfuldiva, #hotgirl, #urbanasian हे हॅशटॅगही त्याला जोडले गेले. यामुळे NSE ला नेटक-यांनी ट्रोल करायला सुरुवात केली. चूक लक्षात येताच NSEने पोस्ट डिलीट करत माफी मागितली.

NSEने चुकीसाठी दिलगिरी व्यक्त केली

राष्ट्रीय शेअर बाजारच्या अधिकृत ट्विटर हँडलवर अर्थव्यवस्था, गुंतवणूक, बाजारपेठेतील ट्रेंड या संबंधीत पोस्ट असतात. मात्र यावेळी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर मौनी रॉयचे फोटो शेअर करण्यात आले. चुक लक्षात येताच NSE ने पोस्ट डिलीट करत दिलगिरी व्यक्त केली. “आज एनएसई हँडलवरून रात्री 12:25 वाजता चुकीची पोस्ट करण्यात आली. एनएसईचे ट्विटर हँडल सांभाळणाऱ्या एजन्सीने केलेली ही चूक होती आणि यात कोणतही हॅकिंग वगैरेचा प्रकार नव्हता. आमच्या फॉलोअर्सना झालेल्या गैरसोयीबद्ल आम्ही माफी मागतो”, असं ट्विट करत त्यांनी स्पष्टीकरण दिले.

एनएसईने माफी मागितली असली तरी हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्याचे स्क्रीनशॉट अनेक युजर्सकडून शेअर करण्यात आले आहेत. एका नेटक-याने लिहिले, 'जी व्यक्ती NSE ट्विटर अकाउंट हँडल करत आहे, त्याने कदाचित दोन पेग एक्स्ट्रा घेतले असावेत.' एक आणखी एका नेटक-याने लिहिले, 'मुलगा कदाचित आपले अकाउंट बदलायला विसरला असावा...'

बातम्या आणखी आहेत...