आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलिब्रिटी मॅनेजर राहिला फर्निचरवालाचा खुलासा:आर्यनप्रमाणेच तिच्याकडेही झाली होती पैशांची मागणी, दिया मिर्झासोबतच्या ओळखीमुळे जावे लागले तुरुंगात

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहिला फर्निचरवाला पहिल्यांदा जेव्हा एनसीबी कार्यालयात पोहोचली होती, तेव्हाचा हा फोटो आहे. - Divya Marathi
राहिला फर्निचरवाला पहिल्यांदा जेव्हा एनसीबी कार्यालयात पोहोचली होती, तेव्हाचा हा फोटो आहे.
  • आर्यनप्रमाणेच राहिलाच्या कुटुंबीयांकडेही पैशांची मागणी करण्यात आली होती

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा जावई साहिल खान याच्याशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेली सेलिब्रिटी मॅनेजर राहिला फर्निचरवालाची 10 महिने तुरुंगवास भोगल्यानंतर सुटका करण्यात आली आहे. तुरुंगातून बाहेर आलेल्या राहिलाने एका मुलाखतीत सांगितले की, तिला या प्रकरणात गोवण्यात आले, कारण ती एका प्रसिद्ध सेलिब्रिटीची मॅनेजर होती आणि ती सेलिब्रिटी एनसीबीच्या रडारवर होती.

राहिलाने सांगितले की, माझ्याकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, पण हो, माझ्या बहिणीकडे एक थोड्या प्रमाणात नक्कीच ड्रग्ज सापडले होते. माझ्या बहिणीला एका दिवसात जामीन मिळाला, पण मला नाही. मला अभिनेत्रीबद्दल प्रश्न विचारण्यात आल्यानंतर मला यामागील कारण कळले. मी त्या अभिनेत्रीला कधी धूम्रपान करताना पाहिले का किंवा तिच्यासाठी कधी ड्रग्ज विकत घेतले का, असे प्रश्न मला विचारण्यात आले. ज्याचे मी नाही असे उत्तर दिले.

आर्यनप्रमाणेच राहिलाच्या कुटुंबीयांकडेही पैशांची मागणी करण्यात आली होती
आर्यन खानच्या बाबतीत जसे घडले तसेच तिच्याबाबतीही घडले. आपल्या कुटुंबाकडूनदेखील पैसे उकळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे राहिलाने उघड केले आहे. राहिलाने सांगितले की, काही लोकांनी माझ्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितले की, जर त्यांनी पैसे दिले तर माझ्यावरील खटला फेटाळला जाईल. पण या लोकांची विश्वासार्हता माहीत नसल्याने माझ्या घरच्यांनी त्यांना किंमत दिली नाही.

राहिलाजवळ कोणतेही ड्रग्ज मिळाले नाही
राहिला ही अभिनेत्री दिया मिर्झाची मॅनेजर होती. एनसीबीच्या रडारवर असलेली अभिनेत्री ही दिया मिर्झाच होती. दियालाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. राहिलाने सांगितल्यानुसार, ड्रग्ज प्रकरणी विशेष एनडीपीएस कोर्टाने असे निरीक्षण नोंदवले आहे की, तिचा फंडिंग, बेकायदेशीर तस्करी आणि गुन्हेगारांना आश्रय देण्यामध्ये सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. तसेच राहिलाच्या जामिनावर युक्तिवाद करताना तिचे वकील तारक सय्यद म्हणाले होती की, तिला या प्रकरणात गोवण्यात आले असून तिच्याकडून कोणतीही सामग्री जप्त करण्यात आलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...