आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पुर्वाश्रमीची पत्नी आलिया यांच्यात मुलांच्या कस्टडीवरून वाद सुरू होता. या वादावर 3 एप्रिल रोजी न्यायालयात सुनावणी झाली असून न्यायालयाने पुढील 45 दिवसांसाठी आलियाला मुलांचा ताबा दिला आहे. यादरम्यान मुलांना दुबईत परत पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 45 दिवसांनंतर कोर्टात या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे. नवाजुद्दीनची दोन्ही मुले दुबईत शिक्षण घेत आहेत.
आलियाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी दिव्य मराठीशी बोलताना ही माहिती दिली आहे. रिजवान सिद्दिकी यांनी सांगितल्यानुसार, नवाजला त्याच्या मुलांना भेटण्यास मनाई नाही. त्याला पाहिजे तेव्हा तो त्याच्या दुबईच्या घरी येऊन मुलांना भेटू शकतो.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयनानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आलिया आणि तिच्या दोन्ही मुलांचा कोर्टाबाहेर पडताना व्हिडिओ शेअर केला आहे.
यापूर्वी 30 मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली होती. त्यावेळी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने म्हटले होते की, त्यांना मुलांच्या भवितव्याची काळजी आहे. त्यामुळेच शांततापूर्ण या प्रकरणावर तोडगा काढला जावा. सुनावणीदरम्यान खंडपीठाने नवाजुद्दीन, आलिया आणि त्यांच्या दोन्ही मुलांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते.
नवाजने दाखवली मानहानीचा खटला मागे घेण्याची तयारी
नवाजुद्दीन सिद्दीकी यापूर्वी आलियाला सेटलमेंट लेटर पाठवले होते. मात्र तरीदेखील त्यांच्यात तडजोड झाली नव्हती. नवाजुद्दीनला आपल्या मुलांना भेटायचे आहे, त्यामुळेच त्याने आलियासोबत तडजोडीचा निर्णय घेतला होता. वृत्तानुसार, यासाठी नवाजुद्दीनने एक अट घातली होती. जर आलियाने त्याला आपल्या मुलांना भेटण्याची परवानगी दिली तर तो मुंबई उच्च न्यायालयात तिच्याविरुद्ध दाखल केलेली याचिका मागे घेईल. दुसरीकडे, आलियाच्या वकिलांचे म्हणणे आहे की, नवाज स्वतः आपल्या मुलांना भेटू इच्छित नाही. त्याला मुलांना भेटण्यापासून कुणीही रोखलेले नाही.
नवाजुद्दीनने दाखल केला होता मानहानीचा खटला
नवाजुद्दीनने काही दिवसांपूर्वी त्याचा भाऊ शमास सिद्दीकी आणि आलियाविरुद्ध 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला होता. नवाजुद्दीनने आरोप केला आहे की, हे दोघे मिळून आपली प्रतिमा जनतेत मलिन करत आहेत. याला उत्तर देताना त्याचा भाऊ शमास याने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे सांगितले होते की, या मानहानीच्या खटल्याला तो घाबरत नाही. नवाजुद्दीनचा भाऊ शमाससोबत का सुरू आहे वाद, येथे वाचा सविस्तर...
काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या?
आलियाने नवाजुद्दीनच्या आईवर मारहाणीचा आरोप केल्यावर नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलियाचे भांडण सुरू झाले. आलियाने सांगितले की, नवाजचे कुटुंबीय तिचे शोषण करत आहेत आणि तिला त्यांच्या मालमत्तेतून बेदखल करत आहेत.
नवाजपासून घटस्फोट घेतल्यानंतरही आम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये होतो आणि घटस्फोटानंतरच दुसरे अपत्य जन्माला आले, पण नवाजने कधीही माझा आदर केला नाही, असे आलियाचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे नवाजच्या आईने आलियावर आरोप करत दुसरे मूल नवाजचे नसून दुसऱ्याचे असल्याचे म्हटले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.