आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद खोलीत सुनावणी:नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मुलांच्या कस्टडीवर आज सुनावणी, EX वाइफला मुलांसह कोर्टात हजर राहण्याचे आदेश

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पुर्वाश्रमीची पत्नी आलिया यांच्यातील मुलांच्या कस्टडीवरुन सुरु असलेल्या वादावर आज सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. 30 मार्च रोजी झालेल्या शेवटच्या सुनावणीत न्यायालयाने मुलांच्या भविष्याचा विचार करून हे प्रकरण बंद खोलीत निकाली काढणार असल्याचे सांगितले होते. विशेष म्हणजे आज होणाऱ्या सुनावणीत आलिया सिद्दीकी हिला आपली 12 वर्षांची मुलगी आणि 7 वर्षांच्या मुलाला देखील सोबत आणावे लागणार आहे. दोन्ही पक्षकारांना बोलावून समजूत काढण्याचा प्रयत्न कोर्ट करणार आहे.

30 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाचे म्हणणे होते की, त्यांना मुलांची काळजी आहे. त्यामुळेच शांततापूर्ण या प्रकरणावर तोडगा काढला जावा. आज या प्रकरणाची कॅमेरासमोर सुनावणी होईल.

नवाजने दाखवली मानहानीचा खटला मागे घेण्याची तयारी
नवाजुद्दीन सिद्दीकी त्याची पुर्वाश्रमीची पत्नी आलियासोबत तडजोड करण्यात तयार आहे. नवाजुद्दीनला आपल्या मुलांना भेटायचे आहे, त्यामुळेच त्याने हा निर्णय घेतला आहे. वृत्तानुसार, यासाठी नवाजुद्दीनने एक अट घातली आहे. जर आलियाने त्याला आपल्या मुलांना भेटण्याची परवानगी दिली तर तो मुंबई उच्च न्यायालयात तिच्याविरुद्ध दाखल केलेली याचिका मागे घेईल. दुसरीकडे, आलियाच्या वकिलांचे म्हणणे आहे की, नवाज स्वतः आपल्या मुलांना भेटू इच्छित नाही. त्याला मुलांना भेटण्यापासून कुणीही रोखलेले नाही.

नवाजुद्दीनच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या मुलांच्या शिक्षणावर यामुळे परिणाम होतोय. त्यामुळे हे प्रकरण लवकरात सोडवण्यात यावे. दुसरीकडे, आलियाच्या वकिलाचे म्हणणे आहे की, त्यांनाही तोडगा हवा आहे, मात्र त्यासाठी नवाजने मुलांना भेटायला हवे.
नवाजुद्दीनच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या मुलांच्या शिक्षणावर यामुळे परिणाम होतोय. त्यामुळे हे प्रकरण लवकरात सोडवण्यात यावे. दुसरीकडे, आलियाच्या वकिलाचे म्हणणे आहे की, त्यांनाही तोडगा हवा आहे, मात्र त्यासाठी नवाजने मुलांना भेटायला हवे.

काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या?
आलियाने नवाजुद्दीनच्या आईवर मारहाणीचा आरोप केल्यावर नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलियाचे भांडण सुरू झाले. आलियाने सांगितले की, नवाजचे कुटुंबीय तिचे शोषण करत आहेत आणि तिला त्यांच्या मालमत्तेतून बेदखल करत आहेत.

नवाजपासून घटस्फोट घेतल्यानंतरही आम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये होतो आणि घटस्फोटानंतरच दुसरे अपत्य जन्माला आले, पण नवाजने कधीही माझा आदर केला नाही, असे आलियाचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे नवाजच्या आईने आलियावर आरोप करत दुसरे मूल नवाजचे नसून दुसऱ्याचे असल्याचे म्हटले आहे.

नवाज आणि आलिया यांना दोन मुले आहेत, दोघेही दुबईत शिकतात. पण सध्या ते भारतात राहत आहेत.
नवाज आणि आलिया यांना दोन मुले आहेत, दोघेही दुबईत शिकतात. पण सध्या ते भारतात राहत आहेत.

आलियाने नवाजुद्दीनवर दाखल केला बलात्काराचा गुन्हा

आलियाने नवाजुद्दीनवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आलियाने सोशल मीडियावर लिहिले होते की, 'नवाजची निर्दयी आई माझ्या निष्पाप मुलाला अनौरस म्हणते आणि हा माणूस गप्प राहतो.

दोन भावांमधील हा वाद खूप जुना आहे. 'बोले चुडियाँ' या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत होता. शमास त्या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होता. मात्र, चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान दोन्ही भावांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या मेकिंग दरम्यान दोघांमध्ये भांडण झाले होते. नवाजुद्दीनने या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिला होता. यानंतर दोघांच्या नात्यात कटुता आली.
दोन भावांमधील हा वाद खूप जुना आहे. 'बोले चुडियाँ' या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत होता. शमास त्या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होता. मात्र, चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान दोन्ही भावांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या मेकिंग दरम्यान दोघांमध्ये भांडण झाले होते. नवाजुद्दीनने या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिला होता. यानंतर दोघांच्या नात्यात कटुता आली.

नवाजच्या मानहानीच्या केसवर भाऊ शमासचा पलटवार
नवाजुद्दीन सिद्दीकीने काही दिवसांपूर्वी आलिया आणि त्याचा भाऊ शमास सिद्दीकी यांना 100 कोटींची मानहानीची नोटीस पाठवली होती. याला प्रत्युत्तर देताना शमासने सोशल मीडियाच्या माध्यमातून नवाजवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. त्याने लिहिले होते की, 'नवाजुद्दीनविरोधात खूप आधी आवाज उठवायला हवा होता. यामुळे माझी 11 वर्षे वाचली असती आणि मला शारीरिक आणि मानसिक छळाचा सामना करावा लागला नसता. तो कर्मचाऱ्यांना तसेच मला मारहाण करायचा. माझ्या शूटिंग सेटवर नवाजने तीन-चार हजार लोकांसमोर सुपरवायझिंग प्रोड्युसरलाही मारहाण केली होती. लवकरच हा व्हिडिओ सर्वांसमोर येणार आहे.'

शमासने या पोस्टसोबत एक व्हॉईस रेकॉर्डिंग आणि फोटोही पोस्ट केला, यात त्याच्या नाकातून रक्त येताना दिसत आहे. तसेच व्हॉईस रेकॉर्डिंगमध्ये दोन लोक एकमेकांशी भांडत असल्याचे ऐकू येतंय. या रेकॉर्डिंगमध्ये खूप आक्षेपार्ह भाषा देखील वापरली गेली आहे.

शमासच्या पत्नीने पोलिसांकडे केली संरक्षणाची विनंती
शमासच्या या ट्वीटवर त्याची पत्नी शीबा शमास सिद्दीकी हिचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. तिने लिहिले की, 'तो 11 वर्षांपासून माझ्या पतीचा छळ करत आहे आणि आता त्याचे करिअर संपवून त्याची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. माझा नवरा आता एकटा नाही, हे लक्षात ठेव. तो एकटाच आहेस, असा विचार करून वर्षानुवर्षे मारहाण, अत्याचार तू त्याच्यावर केले आहेत. मुंबई पोलीस, कृपया माझ्या कुटुंबाला या माणसापासून वाचवा,' असे शमासची पत्नी म्हणाली आहे.